घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंगमनेर : रस्ते दुरुस्तीसाठी १६ कोटी ७० लाख मंजूर

संगमनेर : रस्ते दुरुस्तीसाठी १६ कोटी ७० लाख मंजूर

Subscribe

नामदार थोरात यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर

तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत असून नामदार थोरात यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली आहे. संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे.

२०२१ – २२ च्या विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील रा. म. मा. ७० वाघापूर ते देवगाव, निमगांव टेंभी, शिरापूर, मोधळवाडी, पिंपळगाव देपा, अंभोरे, पिंपरणे, जोर्वे दत्त मंदिर, वडगांव पान रा. म. मा. ५० ला जोडणार्‍या या रस्त्यांसाठी २०० लक्ष मंजूर तर रा. म. मा. ६० ते कोल्हेवाडी, मनोली, रहिमपूर, उंबरी बाळापूर या रस्त्यांसाठी ८० लक्ष मंजूर, मांडवे पिंपळगाव देपा या रस्त्याची सुधारणा करणे ९० लाख रुपये, सावरचोळ, संगमनेर कोपरगाव रस्त्याची सुधारणा करणे चार कोटी ५० लाख, संगमनेर खुर्द ते घुलेवाडी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची सुधारणा करणे पाच कोटी, जिल्हा सरहद्द ते हिवरगाव, डोंगरगाव, चिकणी, सायखिंडी रस्ता एक कोटी रुपये मंजूर पोखरी हवेली, करुले, कवठे कमळेश्वर सामनापूर रस्ता एक कोटी ५० लाख, साकूर जांबूत, नांदूर खंदरमाळ ते घारगाव कवठे पिंपळगाव रस्त्यासाठी एक कोटी असे एकूण १६ .७० कोटींचा निधी या कामांसाठी मिळाला आहे, असल्याचे थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -