शिर्डीत साईबाबांच्या दरबारी भाविकांची मांदियाळी

श्री साईबाबा मंदिरात फुलल्या दर्शनरांगा, कोरोना नियमावलीत दर्शनाला प्रारंभ

Cyber ​​criminals attack cheat devotees in the name of food donation Shirdi Sai Baba
सायबर गुन्हेगारांचा शिर्डी साईबाबांच्या देणगीवरही डल्ला, भक्तांची अन्न दान देणगीच्या नावाने फसवणूक

देश-विदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साईमंदिर अखेर आज दर्शनासाठी खुलं झालं. या पार्श्वभूमीवर साई समाधी मंदिराला फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सकाळपासूनच हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून सुन्या असलेल्या दर्शनरांगा फुलल्या होत्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून विशेष खबरदारी घेतली जातेय. प्रवेशद्वारावर साईभक्तांचं थर्मल स्कॅनिंग, पास तपासणी, तसेच सॅनिटाईजेशन करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जातोय. ऑनलाईन पास सक्तीचा असल्यानं आज दर्शन व्यवस्थेत सुसूत्रता दिसून आली. तर, शिर्डी ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी रांगोळी, तसेच दीपोत्सव करून भाविकांचं स्वागत करण्यात आलं. एकूणच साई मंदिर सुरू झाल्यानं भविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं.