Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र गुटख्याची तस्करी; ५ गजाआड

गुटख्याची तस्करी; ५ गजाआड

१५ लाख ६२ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Related Story

- Advertisement -

राज्यात प्रतिबंध असलेल्या गुटखा, तंबाखूची दोन टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्‍या पाचजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली.पोलिसांनीच्कडून वाहनांसह सुमारे 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शेख नासिर अहमद चाँद मिया (वय 44, रा. गाडेकर गल्ली, भिंगार), शेख अय्याज नसीर(वय 39, रा. मोमीनगल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख (वय 34, रा. नागरदे वळे ता. नगर), सय्यद आसीफ महेमूद (वय 42, रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण (वय 48, रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलिसांच्या माहितीनुसार, नगर-दौंड रोडने नगर शहरात गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अरणगाव चौकात सापळा रचला. पथकाने हिरा गुटखा, रॉयल 717 तंबाखू व दोन टेम्पो (एमएच 16 सीसी 4920), (एमएच 16 सीसी 3621) असा एकूण 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच शेख अब्दूल रऊफ (रा. मोमीनगल्ली, भिंगार) पळून गेला. पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांनी तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -