Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र सासूची सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांना जावयाने पकडले

सासूची सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांना जावयाने पकडले

नाशिकरोड भागातील घटना, पाठलाग करत पकडले महिलांना

Related Story

- Advertisement -

सासूच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या महिलांना जावयाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना नाशिकरोड येथील जेलरोड भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोडच्या कॅनलरोड भागात राहणाऱ्या लक्ष्मी सुरेश धोतरे या शनिवारी (दि. २०) सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशनवर मुलगी व जावई यांना घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथून सकाळी ८ वाजता रिक्षाने जेलरोड येथे परतत असताना आणखी दोन महिला रिक्षात त्यांच्याशेजारी बसल्या. लक्ष्मी धोतरे यांचे जावई सुनील मोरे हे रिक्षा चालकाजवळील सीटवर (फ्रंटशीट) बसले. रिक्षा कारागृहासमोर आली असताना सोनी महेंद्र पवार व मीराबाई बाबुशा पवार (रा. बोरखेड, ता. चौसाळा, जि. बीड) यांनी लक्ष्मी यांच्याजवळील सोन्याची पोत ठेवलेली पर्स हिसकावून पळ काढला. हे पाहताच जावई सुनील यांनी त्या महिलांचा पाठलाग करत नागरिकांच्या मदतीने त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देत सोनसाखळी चोर महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -