घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकीर्तन सुरू असतानाच हभप ताजोद्दिन महाराजांचा मृत्यू, साक्रीतील घटनेने भाविकांना धक्का

कीर्तन सुरू असतानाच हभप ताजोद्दिन महाराजांचा मृत्यू, साक्रीतील घटनेने भाविकांना धक्का

Subscribe

मुस्लिमधर्मिय असूनही वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून होते परिचित

मुस्लिमधर्मिय असूनही वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून परिचित असलेल्या हभप ताजोद्दिन शेख महाराजांचा कीर्तन सुरू असतानाच मृत्यू झाला. सोमवारी (दि.२७) रात्री ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आणि ते जागेवरच बसले. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील जामदे गावात हभप ताजोद्दिन महाराजांचं कीर्तन सुरू होतं. राम मंदिरात सप्ताह सुरू असल्यानं, त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं. वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणूनही ते सर्वदूर परिचित होते. त्यांना हृदयविकाराचा झटका बसल्याचं लक्षात येताच उपस्थित भाविकांनी त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलात दाखल केलं. त्यानंतर नंदुरबारमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. धार्मिक कट्टरपंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचं उल्लेखनीय काम करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

- Advertisement -

सर्वधर्म समभावाची दिली शिकवण

हभप ताजोद्दिन महाराज मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि हिंदू धर्मातील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रवचन देत. जन्म मुस्लीम धर्मात झाला असला तरी हिंदू धर्मातच मरणार. मला हे दोन्हीही धर्म प्रिय आहेत, असंही ते कीर्तनातून सांगत. ताजोद्दीन महाराजांनी औरंगाबाद शहरातून सांप्रदायिक कार्य सुरू केलं. कीर्तन, भारूड, गवळणी आणि रामायणावर त्यांची पकड होती. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, संभाजी महाराज यांच्या संदर्भातही ते कीर्तनातून मार्गदर्शन करत. विशेष म्हणजे मराठी वाड्मय आणि संत साहित्यावर त्यांनी पीएचडी केल्याचंही सांगितलं जातं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -