एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे बनावट कार्ड तयार करून खात्यातून परस्पर लाखो रुपये लुटणार्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराच्या अहमदनगर सायबर क्राईम पोलिसांनी वसई (ठाणे) येथे मुसक्या आवळल्या. सुजित राजेंद्र सिंंग (रा. वसई-विरार, ठाणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. त्यास न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली. याबाबत नगर सायबर क्राईमने दिलेली अधिक माहिती अशी की, बनावट एटीएम कार्डद्वारे एक लाख 44 हजारांची मे महिन्यात फसवणूक झाल्याचा गुन्हा भिंगार पोलिसांत दाखल झाला होता. त्याचा तपास करताना पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजवरून धीरज अनिल मिश्रा आणि सूरज अनिल मिश्रा यांना अटक केली. त्यांच्याकडून 31 बनावट एटीएम कार्ड व 2 लाख 61 हजार 500 रुपये हस्तगत केले होते. त्या दोघांची कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग याचे नाव समोर आले. 11 सप्टेंबर रोजी नगर सायबर पोलिसांना सुजितसिंग हा वसई येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लि कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने वसई येथे लवलेल्या सापळ्यात सुजितसिंग अडकला. त्याच्याकडून लॅपटॉप, 5 मोबाईल हँडसेट, एक संगणक, 17 पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे 4 मशीन, कलर प्रिंटर जमा केले.
बनावट एटीएम बनवणार्या मुख्य सुत्रधाराच्या वसईत आवळल्या मुसक्या
written By My Mahanagar Team
Nashik
न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची कोठडी
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -