कळसुबाई गडावरील नवरात्रोत्सव यंदा ही रद्द

कळसूबाई शिखरावर दरवर्षी एक लाख भाविक येत असल्याने नियोजन करणे करणे प्रशासनाला अडचणीचे

kalsubai shikhar
कळसूबाई शिखरावर बंदी

अकोले ; बारी येथील ग्रामस्थ व कळसूबाई देवस्थान ट्रस्टने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सव कालावधीत पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी करण्यात आल्याचा हा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे, भीमराज अवसरकर यांनी दिली आहे.

याबाबत तहसीलदार, अकोले, सहायक पोलीस निरीक्षक राजूर, वनविभाग यांना कळविण्यात आले आहे. कळसूबाई शिखरावर दरवर्षी एक लाख भाविक येतात, त्यांचे नियोजन प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. सरकारने याबाबत काही निर्बंध लादले असून त्यांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, याचा विचार करून उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.