घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्षांच्या तीन गाड्या पेटवल्या

भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्षांच्या तीन गाड्या पेटवल्या

Subscribe

रविवारी सकाळी उघडकीस आली घटना, गुन्हा दाखल करत पोलिसांनी सुरू केला तपास

संगमनेर येथील भाजपचे ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संपत गलांडे यांच्या बंगल्यात पार्क केलेली सफारी, बुलेट व केटीएम ही तीन वाहने अनोळखी व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि.२६)सकाळी उघडकीस आली. या घटनेत तीनही गाड्या जळून खाक झाल्या.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपालिका क्रीडांगणाशेजारी संपत गलांडे यांचा बंगला आहे. त्यात सफारी, दुचाकी बुलेट व केटीएम अशा तीन गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या तीनही गाड्या अनोळखी व्यक्तीने पेटवून दिल्या. गलांडे यांच्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे वाहनांना आग कुणी लावली हे समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलीस व भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वाहने पेटवणार्‍या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -