भोकरदनमध्ये शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध राहून अनोखी मानवंदना

भोकरदन : सामाजिक कार्य आणि परिवर्तनसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज शुक्रवार दि.6 रोजी 100 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने भोकरदनकरांनी महाराजांना अनोख्या प्रकारे आदरांजली वाहिली. भोकरदनवासीयांनी सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळली.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त शहरातील महात्मा फुले चौकात आदरांजली वाहीली.मित्र मंडळ भोकरदन चे मा.नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव यांच्या वतीने महाराजांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.तसेच सकाळी ठिक 10 वाजता 100 सेकंद उभे राहून लोक राजाला आदरांजली वाहण्यात आली.
या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर तालुक्यातील लोकांनी ही सहभाग घेतला. मुंबई येथील पन्हाळा लॉज या ठिकाणी 6 मे 1922 या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले होते.