घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफायनान्स कंपन्यांच्या तगाद्याला कंटाळून तरूणाची आत्महत्या

फायनान्स कंपन्यांच्या तगाद्याला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Subscribe

तरूणा च्या आत्महत्येस फायनान्स कंपन्याच कारणीभूत असल्याचा मयत भालेराव यांच्या नातेवाईकांच आरोप

मायक्रो फायनान्स व खाजगी फायनान्स कंपन्यानी.भरमसाठ व्याज व दंडाची आकारणी करून पठाणी वसुली करण्याचे काम सुरू केल्यामुळे अनेक कुटुंब या कंपन्यां च्या चक्रव्यूवहामध्ये उजाड झाले आहे. त्यातच नितीन भालेराव या तरूणा च्या आत्महत्येलाही संबंधित फायनान्स कंपन्याच कारणीभूत ठरले असल्याचा आरोप मयत भालेराव यांच्या नातेवाई कांनी केला आहे. राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन विक्रम भालेराव या 34 वर्षीय तरू णाने खाजगी फायनान्स कंपन्यांचे हप्ते भर ण्यास असमर्थ असल्याच्या नैराश्या तून घरातून बाहेर पडले. ते नगर एमआय डीसी येथे मजूर म्हणून कामालाजातहोते. कामाला जाण्यासाठी ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली.

असता त्यांचा मृतदेह महात्मा फुले येथील चिंचे च्या बागेमध्ये गळफास अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सलीम शेख, पोलिस पाटील नन्नवरे, सर पंच भाऊसाहेब कोळेकर, सदस्य पोलिसांना पाचारण केले. तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे हवालदार संजय जाधव यांनी पंचनामा केला. दरम्यान, ग्रामस्थांनी मयत नितीन भालेराव यांनी काही दिवसांपासून दोन खासगी कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी विवंचनेत होते असे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -