Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र खेर्डे येथाल तरुणाची चाकूने भोसकून हत्या

खेर्डे येथाल तरुणाची चाकूने भोसकून हत्या

तीन आरोपी गजाआड

Related Story

- Advertisement -

पाथर्डी  तालुक्यातील खेर्डे येथे शुक्रवारी रात्री ०९ च्या सुमारास एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली आहे. राजेंद्र रामकीसन जेधे (३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नांव असून, जुन्या वादातून तीक्ष्ण हत्याराने त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रशांत बबन शेळके, किशोर भाऊसाहेब शेळके, प्रविण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी, शेषराव दत्तू जेधे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा पुतण्या राजेंद्र जेधे व गावातील प्रशांत बबन शेळके यांच्यात दोन वर्षांपूर्वी गावातील एका लग्नामध्ये नाचण्याच्या कारणावरून हाणामारी झाली होती. त्यावेळी तक्रार न करता आपसांत वाद मिटला होता. तेव्हापासून मनात खुन्नस धरून क्षुल्लक गोष्टीवरून ते एकमेकांसोबत वारंवार भांडत होते. शुक्रवार दि. ०३ सप्टेंबर रोजी रात्री ०९ च्या सुमारास आरोपी किशोर भाऊसाहेब शेळके, प्रविण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके यांनी घराजवळ येऊन मोठ्याने आवाज देत मयत राजेंद्र जेधे याला घराबाहेर बोलावून घेऊन पकडून ठेवत शिवीगाळ केली. यातील आरोपी प्रशांत शेळके याने त्याच्या हातात असलेल्या चाकूने मयत राजेंद्र जेधे यांच्या पोटावर मारल्याने गंभीर जखमी झाले.

- Advertisement -

त्यानंतर राजेंद्र जेधे यांच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. आरोपी प्रशांत बबन शेळके (२३ ), प्रविण बबन शेळके (२६), बबन जगन्नाथ शेळके (४७) सर्वजण खेर्डे, ता.पाथर्डी येथील रहिवासी असून पोलिसांनी आरोपिंना अटक केली आहे. शेवगांव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ बुधवंत, भगवान सानप, अतुल शेळके, राहुल खेडकर आदिंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हे घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने गावात एकच खळबळी उडाली आहे.

- Advertisement -