ZP Election : काँग्रेस वरचढ, पालघरमध्ये सेना, धुळ्यात भाजप, अकोल्यात वंचित, तर वाशिममध्ये राष्ट्रवादीची आघाडी

शिरपूरमध्ये अमरिश पटेल यांचा करिष्मा कायम, धुळ्यात भाजपची सत्ता तर नंदूरबारमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

Election

नाशिक : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपने आघाडी मिळवली आहे. धुळे जिल्ह्यात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल यांचा करिष्मा कायम असून, भाजपच्या पॅनलने येथे जोरदार मुसंडी मारल्याने त्यांची सत्ता निश्चित मानली जात आहे. जिल्ह्यातील १५ पैकी ८ जागा पटकावत भाजपने एकहाती विजय मिळवला. तसेच, नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकते.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार या दोन जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकांचा निकाल बुधवारी (दि. ६) जाहीर झाला. धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १५ जागांसाठी तर पंचायत समित्यांच्या ३० जागांसाठी मतदान झाले. नंदुरबारमध्ये ११ जागांसाठी ही निवडणूक झाली. शिरपूर तालुक्यातील सर्व ६ गणात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित पॅनलने दमदार मुसंडी मारली. या ठिकाणच्या सर्व सहा जागांवर भाजपने विजय मिळवला. दरम्यान, धुळ्यात चंद्रकांत पाटलांची कन्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली. या ठिकाणी भाजपचे सत्ताबळ जवळपास निश्चित मानले जाते आहे.

जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

धुळे-15 (भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2)
नंदूरबार-11 (भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस-3)

धुळे जिल्हा परिषद

एकूण जागा-30
भाजप-१५, शिवसेना-३, राष्ट्रवादी-३, काँग्रेस-५, अन्य-४

नंदुरबार पंचायत समिती

एकूण जागा-१४
भाजप-३, शिवसेना-६, राष्ट्रवादी-१, काँग्रेस-४

निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • अमरिश पटेल यांच्या करिष्मा कायम राहिला
  • त्यांच्या नेतृत्वातच भाजपने या निवडणुका लढल्या
  • शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर
  • नंदुरबार पंचायत समिती शिवसेनेने भाजपकडून हिसकावली
  • पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ गणात सेना उमेदवार विजयी
  • सेनेचे नंदुरबार पंचायत समितीमध्ये आता ११ सदस्य तर भाजपाचे ९ सदस्य
  • शहादा पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता
  • भाजपाकडून घेतली पंचायत समिती ताब्यात