घरमतप्रवाहभाग १४ - कोकण रेल्वे प्रकल्प साकार करणारे पवार साहेब

भाग १४ – कोकण रेल्वे प्रकल्प साकार करणारे पवार साहेब

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या लेखांची ही मालिका.

कोकण देशातील एक सर्वात निसर्गसंपन्न असा भूभाग. पण दळणवळणाच्या दृष्टीने हा भाग स्वातंत्र्यानंतर देखील दुर्लक्षित होता. रेल्वेमार्गाने या भागाला देशाशी जोडायची नितांत अशी गरज होती. १९५२ साली रेल्वेतीलच एक अभियंता असणारे श्री. अर्जुन वालावलकर यांनी कोकण रेल्वेची मागणी केली सर्वप्रथम केली होती. त्यानंतर मधू दंडवते आणि बॅ. नाथ पै यांनी ही मागणी उचलून धरली.पण अतिशय डोंगराळ आणि खडतर मार्ग, आणि राज्यकर्त्यांचा अनुत्साह यामुळे मडगाव ते रोहा या पहिल्या भागाच सर्व्हेक्षण सुरू व्हायलाच, १९८५ साल उजाडव लागलं.

७४१ किमी लांबीचा हा कोकण रेल्वेचा प्रकल्प संपूर्ण किनारपट्टीला जोडणारा हा देशातील लक्षणीय पायाभूत प्रकल्पापैकी एक होता. परंतु यातल्या प्रमुख अडचणी होत्या त्या म्हणजे यासाठी येणार एकूणच अवाढव्य खर्च आणि खडतर भागात या मार्गाची बांधणी करणे. कोकण रेल्वेच्या बाबतीत एक मिटिंग त्याकाळी महाराष्ट्र सदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. १९८९-९० चा तो काळ होता. रेल्वे मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस त्या मिटींगला स्वतः उपस्थित होते आणि पवार साहेब देखील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते.

- Advertisement -

“कोकण रेल्वेसाठी निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत”, हे फर्नांडिस यांनी मिटिंगच्या सुरवातीलाच सांगून टाकले. थोडक्यात हा प्रकल्प गाशा गुंडाळणार अस चित्र होत एकंदरीत. पण पवार साहेबांनी पुढाकार घेत, “एकूण खर्चाचा काही भाग राज्य सरकार उचलेल”, अस त्याठिकाणी सांगितलं.सोबतच या किनारपट्टी वरच्या रेल्वे मार्गाचा ज्या राज्यांना(कर्नाटक, केरळ, गोवा) सर्वाधिक फायदा होणार आहे त्यांनी देखील या खर्चात हातभार लावावा अशी सूचना केली. केंद्र सरकार ५१ टक्के, महाराष्ट्र सरकार २२ टक्के, कर्नाटक १५ टक्के तर गोवा आणि केरळ यांनी प्रत्येकी ६ टक्के असा प्रस्ताव त्या मीटिंगमध्ये तयार केला गेला. थोडक्यात जो प्रकल्प गुंडाळला जाणार होता,त्याला पवारसाहेबांनी तो सुरू व्हायच्या दृष्टीने एक नवी दिशा दिली.

पुढे या चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली गेली.तेंव्हा केरळ ने आपला हिस्सा देण्यास असमर्थता दर्शवली. पुन्हा कोकण रेल्वेच्या मार्गात मोठा अडसर निर्माण झाला. इथं पुन्हा साहेब मदतीसाठी धावून आले.त्यांनी केरळच्या 6 टक्के रकमेची जबाबदारी महाराष्ट्राकडे घेतली. आणि या बैठकीनंतर केंद्राने कोकण रेल्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला. आणि देशातला अत्यंत अवघड आणि खडतर मानला जाणारा रेल्वेमार्ग १९९८ च्या मे महिन्यात सुरू झाला.

- Advertisement -

या ७४१ किमीच्या रेल्वे मार्गाने फक्त वरील ४ राज्यांचीच सोय झाली अस नाही.तर व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा प्रदेश जलद आणि सुरक्षित वाहतुकीने जोडला गेला. मंगलोर आणि मुंबई ही किनारपट्टीवरील बंदर आता जमिनीवरून देखील जोडली गेली. पवार साहेबांनी घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी लागणारी जी काही मदत होती ती उभा करायची दाखवलेली तत्परता, यांच्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला, साकार होऊ शकला.. हे इथं महत्वाचं..!

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -