घरपालघरसेवा रस्त्याची परिस्थिती खराब

सेवा रस्त्याची परिस्थिती खराब

Subscribe

तसेच या सर्व्हिस रस्त्यावरील मोरी पूल मोडकळीस आलेले आहेत. त्याची तात्काळ डागडुजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डहाणू: चारोटी एशियन पेट्रोल पंपालगत असलेला मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) वर्षानुवर्षे दुरवस्थेत आहे. महामार्गावरील बर्‍याचशा समस्या या फक्त कागदावर प्रलंबित आहेत.मात्र त्याचे निवारण होणे गरजेचे असते. परंतु, मुळात या अडचणी,समस्यांकडे महामार्ग प्राधिकरण जाणून बाजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. चारोटी येथील अहमदाबादकडून मुंबईकडे जाणार्‍या महामार्गाचा सर्व्हिस रोड हा दुरावस्थेत वर्षानुवर्षे आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून येणार्‍या -जाणार्‍या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या सर्व्हिस रस्त्यावरील मोरी पूल मोडकळीस आलेले आहेत. त्याची तात्काळ डागडुजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा महामार्ग प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे. त्यातच हा सर्विस रस्ता जणू काही येथे लगत असलेल्या एशियन पेट्रोल पंपाला वापरायला दिला आहे की काय ?? असा प्रश्न प्रवासी विचारताना दिसत आहेत. या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता महामार्ग प्राधिकरण आणि टोल प्रशासन यांनी तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून सेवा रस्ता पूर्ववत करावा आणि पेट्रोल पंपाला वापरण्यात येणारा हा रस्ता महामार्गावरील वाहनांकरिता खुला ठेवावा, यासाठी या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याला संरक्षण उपाययोजना करून तो अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा करावा, अशी या रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनधारक आणि नागरिकांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -