घर पालघर येत्या महिन्याभरात १० एमएलडी पाणी

येत्या महिन्याभरात १० एमएलडी पाणी

Subscribe

त्याची तत्काळ दखल घेत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणी पुरवठा विभागाचे सुरेंद्र ठाकरे, सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस, अभियंता प्रकाश साटम यांना काँग्रेस शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते.

वसई : चार एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा संताप व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने वसई प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने येत्या महिन्याभरात वसई प्रभाग समिती हद्दीत दहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. वसई प्रभाग समितीच्या हद्दीत दररोज सात एमएलडी पाणी पुरवठा मंजूर आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त तीन एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित चार एमएमलडी पाणी मिळत नसल्याने शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि सरचिटणीस किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वसई प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्याची तत्काळ दखल घेत महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पाणी पुरवठा विभागाचे सुरेंद्र ठाकरे, सहाय्यक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस, अभियंता प्रकाश साटम यांना काँग्रेस शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते.

येत्या महिन्याभरात दहा एमएलडी पाणी उपलब्ध केले जाईल. नळजोडणीचे अर्ज केल्यास नळ कनेक्शन दिले जाईल. आय प्रभागातील जुन्या पाईपलाईन त्वरीत बदलण्यात येऊन नवीन पाईपलाईन टाकण्यात येतील. जुने वॉल बदलण्यात येतील. सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात येतील. पाण्यासंबंधी तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी महापालिका मुख्यालयात ऑनलाईन तक्रार कक्ष सुरु करण्यात येईल. आदी मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी माजी सरपंच जॉर्ज फर्नांडीस, कुलदीप वर्तक, व्हॅलेंटाईन मिर्ची, विजय बंगा, आनंद चव्हाण, सलीम खिमाणी, रॉईस फरेल, शबाना कुरेशी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -