घरपालघरपोलिसांसाठी म्हाडातील विरार, बोळींजमध्ये १०९ सदनिकांची निश्चिती व वितरण 

पोलिसांसाठी म्हाडातील विरार, बोळींजमध्ये १०९ सदनिकांची निश्चिती व वितरण 

Subscribe

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकेचे प्रथम सूचना पत्रही प्रदान करण्यात आले.

पालघर पोलीस दलातील १०९ कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे उभारलेल्या गृहनिर्माण योजनेतील इमारत क्रमांक १० मधील सदनिका क्रमांकांची निश्चिती व वितरण बुधवारी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्या ए-३ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन, एसीपी चंद्रकांत जाधव, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, उपमुख्य अधिकारी रवी पाटील, मिळकत व्यवस्थापक पंकज बोबडे, मिळकत व्यवस्थापक मानसी मोरे, जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच पत्र पाठविली जाणार

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते आज सदनिका निश्चित झालेल्या पालघर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आव्हाड, जागृती मेहेर, रुक्मिणी राठोड, अदिती सरनोबत, फिरोझ तडवी यांना सदनिकेचे प्रथम सूचना पत्रही प्रदान करण्यात आले. कोंकण मंडळातर्फे उर्वरित सदनिका लाभार्थ्यांना लवकरच प्रथम सूचना पत्र पाठविली जाणार आहेत. म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे विरार बोळींज येथे सुमारे ११९ एकर जमिनीवर गृहनिर्माण योजना विकसित करण्यात आली आहे. या योजनेतील टप्पा – ३ मधील इमारत क्रमांक १० मधील १८६ सदनिका पालघर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना वितरित करण्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या दिनांक ०४ जानेवारी २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक ६८०९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

सदर १८६ सदनिकांसाठी पालघर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्याकरीता मार्च २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली. त्यानुसार पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून १०९ अर्जदारांच्या नावांची यादी पाठविण्यात आली. या १०९ कर्मचाऱ्यांना इमारतीतील कितव्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वितरित करावयाची, याची निश्चिती व त्यांचे वितरण आज करण्यात आले. पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी प्राप्त झाल्यास उर्वरित ७७ सदनिकांचेही वितरण करण्यात येणार असल्याचे डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ ४३४.९७ ते ४५३.२७ चौरस फूट असून या सदनिकांची अंदाजित विक्री किंमत रु. २७. ०० लाख रुपये आहे. या योजनेतील टप्पा – ३ मधील इमारतींना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -