Eco friendly bappa Competition
घर पालघर पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 114 कोटी

पालघर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 114 कोटी

Subscribe

यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांचा प्रवास पुढील काळात सुखकर होण्यास मदत होणार आहे.

बोईसर: गेली अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पालघर जिल्ह्यातील 121 किमीच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी 105.20 कोटी आणि दोष दायित्वासाठी 8.81 कोटी असा एकूण 114 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे.पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण 17 रस्त्यांच्या कामांसाठी निविदा प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांचा प्रवास पुढील काळात सुखकर होण्यास मदत होणार आहे.

यातील बरेचसे रस्ते हे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत होते.जिल्हा परिषदेकडे या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारा मोठा निधी नसल्याने हे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्यसरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.या नंतर राज्य सरकारकडून रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव अंतिम मान्यता व निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार तांत्रिक मान्यतेनंतर 17 रस्त्यांच्या कामांसाठी जवळपास 114 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येणार्‍या या रस्त्यांमध्ये डहाणू तालुक्यातील 3,जव्हार तालुक्यातील 2,तलासरी तालुक्यातील 2,मोखाडा तालुक्यातील 2,पालघर तालुक्यातील 3,विक्रमगड तालुक्यातील 3 आणि वाडा तालुक्यातील 2 अशा एकूण 17 कामांचा समावेश आहे.या कामांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण,लहान मोठ्या मोरी पूल बांधणे आणि डांबरीकरण यांचा समावेश असून ठेकेदारांना 12 महिन्यांत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रमुख रस्त्याचे नाव आणि मंजूर निधी

बांधघर-निंबापूर भोयेपाडा रस्ता (6.9 किमी) – 4.60 कोटी
सारणी-उर्से -साये रस्ता (15.1 किमी) – 18.56 कोटी
गंजाड – धानीवरी रस्ता (8.2 किमी) – 6.64 कोटी
परनाली – बोईसर रस्ता (9.3 किमी) – 7.96 कोटी
वेळगाव – कोंढाण -मनोर रस्ता (7.6 किमी) – 8.56 कोटी
बोरेशेती रस्ता (4.8 किमी) – 4.7 कोटी
केळीचा पाडा – दाभोसा रस्ता (3.8 किमी) – 2.78 कोटी
आडखडक – कुतुरविहीर रस्ता (3.2 किमी) – 1.86 कोटी
तुळयाचा पाडा – हिरवे रस्ता (4.3 किमी) – 3.26 कोटी
झरी -सवणे रस्ता (5.0 किमी) – 4.04 कोटी
संभा – सवणे-वडवली रस्ता (8.9 किमी) – 9.1 कोटी
कुर्झे-हातणे-देहर्जे रस्ता ((5.1 किमी) – 3.95 कोटी
चाबके तलावली – घाणेघर रस्ता (7.1 किमी) – 5.18 कोटी
खुपरी -आंबिटघर रस्ता (9 किमी) – 8.8 कोटी
पोशेरी-पिंपळास-खरीवली रस्ता (4.3 किमी) – 8.93 कोटी
मोरांडा – गोंदे रस्ता ( 6 किमी) – 3.44 कोटी
केव -म्हसरोली-कुर्झे रस्ता (7.1 किमी) – 5.35 कोटी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -