Eco friendly bappa Competition
घर पालघर पालघर जिल्ह्यात ६ महिन्यांत १२४ अपघाती मृत्यू

पालघर जिल्ह्यात ६ महिन्यांत १२४ अपघाती मृत्यू

Subscribe

सिट बेल्टचा वापर न करता वाहन चालवणे, विरुध्द दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारे वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

बोईसर: पालघर जिल्ह्यामध्ये २०२२ या वर्षात रस्ते अपघातामध्ये २०१ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.तर जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ पर्यंत फक्त ६ महिन्यांत आतापर्यंत तब्बल १२४ व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. रस्ते अपघातामध्ये वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघात होवून मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सिट वाहन चालवणे, बिना हेल्मेट वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, सिट बेल्टचा वापर न करता वाहन चालवणे, विरुध्द दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारे वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालविल्यामुळे रस्ते अपघात होवून वाहन चालकांना अपघातामध्ये गंभीर दुखापती होवून मृत्यूमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये १ जूनपासून जिल्हा वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाणे यांच्या सोबत नाकाबंदी आयोजित करून नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून खालील दंड वसूल करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -