घरपालघरपालघर एसटी विभागातील १२९ कर्मचारी निलंबित

पालघर एसटी विभागातील १२९ कर्मचारी निलंबित

Subscribe

पालघर विभागात संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यामध्ये फूट पडत असतानाच कामावर गैरहजर रहात असलेल्या १२९ चालक व वाहक यांच्यासह अन्य कर्मचार्‍याना निलंबित करण्यात आले आहे.

पालघर विभागात संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यामध्ये फूट पडत असतानाच कामावर गैरहजर रहात असलेल्या १२९ चालक व वाहक यांच्यासह अन्य कर्मचार्‍याना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी ९१ जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून ८८ कंत्राटी कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एसटीच्या संपामुळे सर्वत्रच प्रवाशांची गैरसोय होत असून सहा आसनी रिक्षा, मिनीडोर, काळीपिवळी यांनी मात्र मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू ठेवून एका बाजूला प्रवाशांचे वाहतूक सेवा सुरू ठेवली आहे. तर दुसर्‍या बाजूला प्रवासी भाड्यामध्ये दुप्पट वाढ करून प्रवाशांच्या या अडचणीच्या गैरफायदा घेत लुट मात्र सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था सुरू असल्याने या संपामुळे प्रवासी भरडला जात आहे.

राज्य परिवहन विभागाच्या पालघर जिल्ह्यात आठ आगार असून या आगारात एसटी वाहक, चालक, मेकॅनिक, लिपिक व अधिकारी इत्यादी काम करत आहेत. यापैकी पालघर आगारात या बंद कालावधीत ११ जणांना निलंबित करण्यात आले असून १० रोजंदार कर्मचार्‍यांना नोटीसा बजावण्यात आले आहेत. तर बंद कालावधीत १० कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. बोईसर आगारातील बंद कालावधीत २० जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर १४ रोजंदारी कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली असून १४ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सफाळा आगारातील १० कर्मचार्‍यांच निलंबन करण्यात आले असून रोजंदारीमधील ५ कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आली आहेत. तर ४ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

डहाणू आगारातील एका कर्मचार्यातला निलंबित करण्यात आले असून रोजंदारीवरील ४ कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर ३ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. जव्हार आगारातील ७ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असून रोजंदारीवरील ९ कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर ९ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. अर्नाळा आगारातील ११ कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे तर रोजंदारीवरील २४ कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २३ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

वसई आगारातील १९ कर्मचार्‍यांच निलंबन करण्यात आला आहे. तर रोजंदारीवरील ७ कर्मचार्‍यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. ७ कर्मचार्‍यांच्या सेवा समाप्त करण्यात आली आहे. नालासोपारा आगारातील २१ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असून रोजंदारीवरील १८ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर १८ कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. पालघर येथील विभागीय कार्यालयात असलेल्या कर्मचार्‍यांपैकी १४ कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर विभागीय कार्यशाळेमध्ये काम करणार्‍या ८ कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे आणि विभागीय भांडार विभागांमध्ये काम करणार्‍या १७ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

एसटीच्या पालघर विभागातील जव्हार वसई अर्नाळा सफाळा बोईसर पालघर नालासोपारा डहाणू अशा आठ आगारातील चालक व वाहक तसेच सफाई कामगार, प्रमुख कारागीर, चालक तथा वाहक, सहाय्यक, कारागीर, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, लेखाकार, वरिष्ठ लिपिक अशा एकूण १२९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. रोजंदारीवरील ९१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर ८८ जणांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक आशिष चौधरी यांनी दिली.

हेही वाचा –

आज सचिन वाझे – अनिल देशमुख यांच्यात १० मिनिटे चर्चा, आयोगाने पोलिसांना खडसावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -