Eco friendly bappa Competition
घर पालघर करवाढ नसलेला २ हजार ७८० कोटींचा अर्थसंकल्प

करवाढ नसलेला २ हजार ७८० कोटींचा अर्थसंकल्प

Subscribe

तर महसुली अनुदानापोटी ५२३ कोटी, भांडवली अनुदानापोटी ३२० कोटी आणि इतर अनुदानातून ५५ कोटी ३३ लाख रुपये अपेक्षित आहेत.

वसईः वसई – विरार महापालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला पाचशे कोटी रुपये शिल्लक असलेला २ हजार ७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक तथा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सादर केला. नागरी सुविधांवर भर देतानाच नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतदू करण्यात आली आहे.
महापालिका अस्तित्वात नसल्याने प्रशासक अनिलकुमार पवार यांनी सलग दुसर्‍यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. आस्थापनावरील खर्च कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे. यंदा चारशे कोटी रुपये मालमत्ता कर वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी त्यापेक्षा अधिक वसुलीची अपेक्षा धरण्यात आली आहे. नगररचना विभागातून २७० कोटी रुपये, अग्निशमन विभागातून ५० कोटी रुपये, स्वच्छता करापोटी २८ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागातून ८० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहेत. तर महसुली अनुदानापोटी ५२३ कोटी, भांडवली अनुदानापोटी ३२० कोटी आणि इतर अनुदानातून ५५ कोटी ३३ लाख रुपये अपेक्षित आहेत.

महावितरणची वीज बिले कमी करण्यासाठी शहरात टप्याटप्याने एलईडी दिवे बसवण्यात येणार असून त्यासाठी ६६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर आदिवसी पाड्यांवर विजेची व्यवस्था करण्यासाठी सोल स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहेत. शहरीकरणामुळे उभ्या राहत असलेल्या उंच इमारती लक्षात घेऊन यावेळी अग्निशमन विभागासाठी तब्बल ११४ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून अत्याधुनिक आणि मोठ्या उंचीची वाहने खरेदी केली जाणार आहेत. शहरातील कचर्‍याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. शहरवासियांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी बहुउद्देशीय रुग्णालय बांधण्यात येणार असून त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी शहर सौदर्यीकरण, तलाव सुशोभिकरणावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर शहरातील क्रीडापटूंना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी अर्थसंकल्पात ६२ कोटी २६ लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. सूर्या पाणीपुरवठा योजनेसह खोलसापाडा योजनेतून २४५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

उत्पन्नः

० मालमत्ता करः ३३६ कोटी ५७ लाख रुपये

- Advertisement -

० स्थानिक संस्थाकरः १५कोटी रुपये

० नगर रचना विभागः १७१ कोटी ९५ लाख रुपये

० अग्निशमन सेवाः ३३ कोटी ५० लाख

० जाहिरात परवाना फी व जागा भाडेः ६ कोटी

० स्वच्छता करः २८ कोटी २० लाख रुपये

० पाणी पुरवठा सेवाः ४५ कोटी रुपये

० महसूली अनुदानेः ५२३ कोटी ८३ लाख रुपये

० इतर जमाः ५५ कोटी ३३ लाख रुपये

० भांडवली अनुदानेः ३२० कोटी १९ लाख रुपये

खर्चः

० आस्थापनाः ३४ कोटी ७४ लाख रुपये

० नगर रचना विभागः २१ कोटी ५ लाख रुपये

० विद्युत विभागः ९२ कोटी ४२ लाख

० अग्निशमन विभागः ११४ कोटी ४५ लाख रुपये

० आपत्ती व्यवस्थापनः ७ कोटी ९४ लाख

० घनकचरा व्यवस्थापनः २४४ कोटी ३० लाख

० वैद्यकीय आरोग्य विभागः ११३ कोटी ८२ लाख

० दिव्यांग कल्याणकारी योजनाः ११ कोटी १० लाख

० महिला बालकल्याणः २१ कोटी ६७ लाख

० मागासवर्गीय कल्याणकीर योजनाः २६ कोटी ९३ लाख

० परिवहन सेवाः ४२ कोटी

० बांधकाम विभागः ८१४ कोटी ४४ लाख

० उद्यान विभागः ४० कोटी ५० लाख

० वृक्ष व पर्यावरणः २७ कोटी ५६ लाख

० तलाव सुशोभिकरणः ६४ कोटी

० क्रीडा विभागः ६२ कोटी २६ लाख

० पाणीपुरवठा विभागः ३१३ कोटी ६२ लाख

- Advertisment -