Eco friendly bappa Competition
घर पालघर जव्हारच्या रस्ता समस्यांवर २७ कोटी निधी उपाय

जव्हारच्या रस्ता समस्यांवर २७ कोटी निधी उपाय

Subscribe

याकरिता बजेट अधिवेशनात आदिवासी विकास विभागामार्फत १४.५० कोटी निधी मंजूर केला. तसेच पावसाळी अधिवेशनात या भागातील रस्ते विकासकरिता १२.६५ कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे.

जव्हार: जव्हार तालुक्यात ग्रामीण आदिवासी भागामध्ये राहणार्‍या जनतेला रस्त्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, सर्प दंश सारख्या रुग्णांना रुग्णालयात नेत असताना केवळ डोलीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.यावर उपाय म्हणून आता भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेच्या माध्यमातून येथील परिस्थिती बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २७ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यातून १२५.३० की.मी.अंतराचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबाबत भाजपचे जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेवून पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. यावर मंत्री चव्हाण यांनी या भागातील रस्ते विकसित व्हावेत म्हणून पालघर जिल्हा परिषद यांचे १२५.३०० की.मी.लांबीचे ग्रामीण मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले आहेत. याकरिता बजेट अधिवेशनात आदिवासी विकास विभागामार्फत १४.५० कोटी निधी मंजूर केला. तसेच पावसाळी अधिवेशनात या भागातील रस्ते विकासकरिता १२.६५ कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे.

कोट

- Advertisement -

या योजनेंतर्गत तालुक्यातील आदिवासी वाडे-पाडे यांना बारमाही मुख्य रस्त्याशी जोडणे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रस्ते बारमाही करणे आणि आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय तालुक्यातील उर्वरित रस्ते हे टप्प्याटप्प्याने तयार केले जाणार आहेत.

– कुणाल उदावंत,अध्यक्ष, जव्हार तालुका,भाजप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -