घरपालघरपाण्याच्या प्रतिक्षेत ४ हजार ९४५ नळजोडण्या

पाण्याच्या प्रतिक्षेत ४ हजार ९४५ नळजोडण्या

Subscribe

२०२० पासून महापालिकेने नळजोडण्या देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे ४ हजार ९४५ नळजोडण्यांची प्रतिक्षा यादी आहे.

वसईः वाढीव पाणी उपलब्ध झाल्याने नवीन नळजोडणी मंजूर करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने अर्थसंकल्पातून दिली आहे. महापालिकेची पाण्यासाठीची मुख्य भिस्त सूर्या धरण प्रकल्प योजनेवरच असल्याने आगामी काळात एमएमआरडीएकडून मिळणार्‍या १८५ एमएलडी पाणी उपलब्धता आणि १७ जलकुंभांच्या पूर्णत्वानंतरच या नळजोडणींना मंजुरी मिळणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये या जलकुंभांचे काम व पाणी उपलब्ध होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंतचा अनुभव पाहता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नळजोडणी देण्याचे काम सुरु होईल, असे दिसते. २०२० पासून महापालिकेने नळजोडण्या देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे ४ हजार ९४५ नळजोडण्यांची प्रतिक्षा यादी आहे.

महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुर्‍या प्रमाणात असल्याने शहरातील बहुतांश इमारतींना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला २५ लाखांहून अधिक झाली आहे. या लोकसंख्येला ३५० एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहराला २३० एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरण प्रकल्प योजनेतून १८५ एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १५ एमएलडी आणि फुलपाडा पाणी योजनेतून १.५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. भविष्यात महापालिकेला खोलसापाडा-१ व खोलसापाडा-२ धरण योजनेतून ७० एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे. तसेच वसई-विरार महानगरपालिका व मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरता सूर्या धरण प्रकल्प योजनेतून ४०३ एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेतून वसई-विरार महापालिका व परिसरातील २७ गावांना १८५ एमएलडी तर उर्वरित पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात येणार आहे. वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून शहराची तहान भागवण्याकरता १८ जलकुंभ बांधण्याचे काम २०१४ पासून हाती घेण्यात आलेले आहे. १७ जलकुंभांपैकी आठ जलकुंभांचे काम पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित १० जलकुंभांचे काम अपूर्णावस्थेत आहे. मात्र डिसेंबर २०२२ अखेर हे काम पूर्ण होऊन हे जलकुंभ कार्यान्वित होतील, अशी माहिती नोव्हेंबर २०२२ मध्ये पालिकेतून देण्यात आलेली होती. प्रत्यक्षात २०२३ ची सुरुवात झाली असली तरी हे काम पूर्ण झालेले नाही.

- Advertisement -

 

पाणी निवडणुकीचा मुद्दा

- Advertisement -

महापालिका स्थापनेपासून महापालिकेच्या निवडणुका पाण्यावर लढवल्या गेलेल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजना व जलकुंभांचे भूमिपूजन करून बहुजन विकास आघाडीने वसई-विरारकरांना खूश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा होत नसल्याने वसई-विरारकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -