घरपालघरगावांमध्ये ४३ कोटी ५० लाखांची विकास कामे

गावांमध्ये ४३ कोटी ५० लाखांची विकास कामे

Subscribe

पावसाळ्यात ग्रामीण भागांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. पायाभूत सोयी सुविधेमुळे गावखेडी समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

वसईः आमदार राजेश पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजना, अल्पसंख्यांक वसती सुधार योजना, प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ४३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. एकीकडे, वसई -विरार शहरांचा झपाट्याने विकास होऊन ही शहरे समृद्ध होत असताना आणि पायाभूत सोयी सुविधांनी सक्षम होत असताना काही अंतरावरच असलेल्या लगतच्या गाव खेड्यांमध्ये मात्र त्याची वानवा होती. बरीच वर्षे हा ग्रामीण भाग विकासापासून वंचित होता. पावसाळ्यात ग्रामीण भागांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते. पायाभूत सोयी सुविधेमुळे गावखेडी समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

वसई तालुक्यातील खार्डी, डोलिव, खानिवडे, भाताणे, मांडवी, शिवणसाई, पारोळ, तिल्हेरे, कोलोशी, मेढे फाटा अशा अनेक गावांत विविध विकास कामे केली जाणार आहेत. यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, वसई पंचायत समिती सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका रमा किणी,माजी सभापती गीता पाटील,बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, बाजार समितीचे सर्व संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. संबंधित खात्यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. ’बहुजन विकास आघाडी’चे सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचाचत समिती सभापती, उपसभापती व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -