घरपालघरपालघर जिल्ह्याच्या विकासासाठी 437.76 कोटींचा निधी

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी 437.76 कोटींचा निधी

Subscribe

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुशील पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पालघर : जिल्हा वार्षिक योजना 2022-23 करता ( सर्वसाधारण , आदिवासी उपाययोजना व अनुसुचित जाती योजना ) पालघर जिल्ह्यासाठी 437.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालघरमध्ये बोलताना दिली. पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. मंजूर झालेल्या निधीत टीएसपीसाठी 276.12 कोटी रुपये, जिल्हा वार्षिक ( सर्वसाधारण ,) योजनेकरता 149 .6 9 कोटी इतका निधी मंजूर झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुशील पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.  17 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्ताला यावेळी मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) विशेष घटक योजना ,आदिवासी घटक कार्यक्रम सन 2021- 22 च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली. तसेच मागील वर्षी झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला, असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

खेलो इंडियातून दर्जेदार खेळाडू तयार होतील

- Advertisement -

खेलो इंडिया या योजनेतून देशामध्ये एक हजार खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यासाठी बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. या प्रशिक्षण केंद्रामधून दर्जेदार गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रातील अद्ययावत बॉक्सींग रिंगचे उद्घाटन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास व्हनमाने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आवश्यक असते. तसेच उत्तम दर्जाचा आहार आवश्यक असतो. खेलो इंडियाच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रातून या सर्व बाबी पुरवल्या जातील. खेळाडू घडवण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनीही हातभार लावून उत्तम खेळाडू घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -