घरपालघरगणेशोत्सवासाठी पालघर विभागातून कोकण मार्गावर धावणार 448 बस

गणेशोत्सवासाठी पालघर विभागातून कोकण मार्गावर धावणार 448 बस

Subscribe

गणेशोत्सवासाठी पालघर एसटी महामंडळाने यंदा कोकणासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पाल घर जिल्ह्यातील चाकरमानी गौरी गणपतीच्या हक्काच्या सणाला कोकणात पोहोचू शकली नव्हती कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे बहुतेकांनी जायचे टाळले होते.

पालघर : गणेशोत्सवाला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सवासाठी पालघर एसटी महामंडळाने यंदा कोकणासाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पाल घर जिल्ह्यातील चाकरमानी गौरी गणपतीच्या हक्काच्या सणाला कोकणात पोहोचू शकली नव्हती कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे बहुतेकांनी जायचे टाळले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील तीन आगारातून 448 बसेस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत या संख्येमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता असल्याचेही पालघर विभागातून सांगण्यात आले.

कोकण आणि गणेशोत्सवाचा अतूट नाते आहे. घरोघरी गणपतीचे आगमन होत असते जस जसा गणेशोत्सव जवळ येत जातो, तसे तशी कोकणात जाणार्‍यांची लगबग सुरू होते. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस स्थिरावला आहे. यावर्षी वसई तालुक्यातील वसई आगारातून दहा अर्नाळातून 65 तर नालासोपारामधून 373 अशा 448 एसटीच्या बसेस 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान कोकणाकडे मार्गस्थ होणार आहेत.
448 बसेस कोकणात मार्गस्थ होणार असल्याने पालघर विभागाने पुणे विभागाकडून 209 जादा बसेस मागवल्या आहेत. पालघर विभागाच्या 248 बसेस सुद्धा धावणार आहेत. बर्‍याच बसेसचे आरक्षण झालेले आहे. एकंदर गणेशोत्सवास आता 448 बसेस जात असल्या तरी अजून बसेसच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान एकंदर सुमारे 25 ते 30 हजार प्रवासी प्रवास करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -