घरपालघरवाढवण बंदर विरोधात ५ तास ठिय्या आंदोलन

वाढवण बंदर विरोधात ५ तास ठिय्या आंदोलन

Subscribe

यावेळी मोर्चेकरी वैभव वझे, नारायण पाटील, देवेंद्र तांडेल ,मिलिंद राऊत, ज्योती मेहेर,ब्रोयोंन लोबो , महेंद्र आरेकर अनेक कार्यकर्ते सहभागी होते .

बोईसर: वाढवण बंदराच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी पालघरमध्ये १९ जानेवारी रोजी जनसुनावणी झाली होती. मात्र ही जनसुनावणी बेकायदा असल्याचा आरोप करत वाढवण बंदर संघर्ष समिती आणि अनेक संघटनांकडून या जनसुनावणीला विरोध करण्यात आला आहे. बेकायदेशीर घेतलेली जनसुनावणी रद्द करून पुन्हा जनसुनावणी घ्यावी, या मागणीसाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती सहित अनेक संघटनांकडून आज महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा बोईसर येथील आंबट गोड मैदान येथून सुरू झाला.या मोर्चात हजारों लोकांनी सहभाग दर्शवला. मोर्चा थेट बोईसर- तारापूर कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालयावर धडकला असून वाढवन बंदर विरोधात निवेदन देण्यात आले. सकाळी ११ ते ०३ वाजेपर्यंत (५ तास) ठिय्या आंदोलन सुरू होते.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या तीव्र आंदोलनानंतर अखेर मंगळवारी ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि वाढवण बंदर युवा संघर्ष समितीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देण्यात येणार असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र प्रदूषण मंडळकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. झालेली जन सुनावणी ही कायद्याला धरून नसल्याने ती रद्दबातल करून नव्याने वाढवण गावात घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरी वैभव वझे, नारायण पाटील, देवेंद्र तांडेल ,मिलिंद राऊत, ज्योती मेहेर,ब्रोयोंन लोबो , महेंद्र आरेकर अनेक कार्यकर्ते सहभागी होते .

 

- Advertisement -

लेखी निवेदन स्वीकारले आहे. वाढवण मोर्चेकर्‍यांना लेखी उत्तर कळवले जाईल.
– राजू आर वसावे , उपप्रादेशिक अधिकारी ,तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधिकारी वर्ग १

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -