घरपालघरविविध प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ५ ते २० डोंगर भुईसपाट

विविध प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ५ ते २० डोंगर भुईसपाट

Subscribe

युएसएमएल लिमिटेड या कंपनीचे सरकारची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन सुरू केली आहे.

पालघर जिल्ह्यातून रायगड-उरणच्या जेएनपीटी ते दिल्ली या डीएफसीसी, मुंबई -बडोदा एक्स्प्रेस, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि विरार-डहाणू उपनगरी तीन व चार अशा जाणार्‍या प्रकल्पासाठी लागणार्‍या माती, मुरूम आणि दगडासाठी पालघर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागातील जवळपास १५ ते २० डोंगर भुईसपाट करण्याचे काम मोठ्या सुरु आहेत. मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे. पर्यावरणाला प्रचंड फटका बसणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी याबाबत विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यातील विशेषतः जंगलपट्टीतील आदिवासी पाड्याच्या जवळ प्रकल्प उभारणार्‍या कंपनीना मुरूम, माती, दगड पुरविण्याचे काम काही जिल्ह्याबाहेरील तर काही स्थानिक ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ३५० ते ४०० मोठे (आयवा) ट्रक डोंगर खोदून तेथील माती, मुरूम, दगड या प्रकल्पाच्यासाठी दिवसरात्र पुरवत आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात अर्धा किलोमीटर लांबीचे डोंगर पार भुईसपाट करण्यात येत आहेत. युएसएमएल लिमिटेड या कंपनीचे सरकारची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर आरएमसी प्लान्ट आणि क्रशर मशीन सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या या प्लान्टमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा फटका आदिवासी पाड्यातील लोकांना व बागायती शेतीला बसत असल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.

संबंधित कंपनीची चौकशी करून त्यामध्ये काही अनियमितता आढळली, तर कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल.
– अभिजीत देशमुख, तहसिलदार, डहाणू

- Advertisement -

पालघर तालुक्यातील सफाळे, गारगांव, किराट, धुकटंण, डहाणू तालुक्यातील वाणगाव आदी भागात मोठमोठे डोंगर जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मोजक्या ठिकाणी परवानगी घेण्यात आली असून अन्य ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता महसूल विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून गुपचूप काम सुरू आहे. इतकेच नव्हे तर वन खात्याचे डोंगरदेखील जेसीबी मशीनद्वारे भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र वन विभाग त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. वन जमिनीतील माती काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चुप्पी साधण्याचे तोंडी आदेश आल्याने वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे खासगी बोलले जाते आहे.

युएसएमएल लिमिटेड कंपनीच्या वाणगाव येथील आरएमसी प्लांट आणि क्रशर मशीनसाठी महसूल तसेच प्रदूषण नियंत्रण संबंधित सर्व आवश्यक परवानग्या आमच्या कंपनीकडे आहेत. तसेच शेजारील आदिवासी पाडा आणि शेतीचे काही नुकसान होत असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल.
– के. के. नायर, व्यवस्थापक

- Advertisement -

जेएनपीटी ते दिल्ली दरम्यान पश्चिम रेल्वेला समांतर डीएफसीसी प्रकल्पाचे काम सुरू असून यासाठी लागणारे रेडिमिक्स काँक्रीट ग्रीन झोन असलेल्या वाणगाव वाकीपाडा येथील सर्वे क्र. ७४ येथील आरएमसी प्लांटमध्ये तयार केले जाते. यासाठी मोठे क्रशर मशीनदेखील बसविण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी युएसएमएल लिमिटेड या कंपनीने महसूल आणि प्रदूषण विभागाची कोणतीही आवश्यक परवानगी घेतलेली नाही. आरएमसी प्लांट आणि क्रशर मशीनसाठी प्रकल्पासाठी शेतजमिनीची अकृषिक परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु वाणगाव येथील युएसएलएम लिमिटेड या कंपनीने अकृषिक परवानगी नसल्याचे तसेच रेती, खडी या बांधकाम साहित्याची रॉयल्टी न घेतल्याप्रकरणी जागा मालक आणि कंपनीला डहाणूच्या तहसिलदारांनी जानेवारी महिन्यात नोटीस बजावली होती.

वाणगाव परिसरात तयार होणारी तिखट मिरची आणि ढोबळी मिरची संपूर्ण देशात प्रसिद्ध असून परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यामध्ये साधी मिरची ८०० हेक्टर तर ढोबळी मिरचीचे २५० हेक्टरवर पीक घेतले जाते. परंतू वाणगाव पूर्वेला वाकीपाड्यानजीक युएसएमएल कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील आरएमसी प्लांटमधून उडणारे धुळीकण हवेद्वारे आजूबाजूच्या बागायतीमधील पिकांवर बसत असल्याने मोठ्या प्रमाणात रोग पसरून पिकांची प्रत घसरल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळत नसून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या प्लांटवर ताबडतोब बंदीची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा – 

मोठी बातमी! मेधा सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -