Eco friendly bappa Competition
घर पालघर मीरा- भाईंदर शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ५१६.७८ कोटी निधी मंजूर

मीरा- भाईंदर शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ५१६.७८ कोटी निधी मंजूर

Subscribe

मीरा-भाईंदर शहराच्या दृष्टीने अत्यंत असा महत्वाचा हा निर्णय असून पुढील दीड महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून या कामाचा शुभारंभ नवीन वर्षात केला जाईल , अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. कामाची सुरुवात झाल्यानंतर पुढील २४ महिन्यांत हा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून तसा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. रुपये ५१६.७८ कोटी रुपये खर्चास ही मान्यता मिळाली असून त्यातून मीरा- भाईंदरमध्ये पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. पुढील ३० वर्षांची शहराची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून ही पाण्याची योजना राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारकडून आम्ही मंजूर करून आणली असून २१८ एमएलडी पाणी मीरा-भाईंदरला पुढील वर्षी मिळणार आहे. मीरा-भाईंदर शहराच्या दृष्टीने अत्यंत असा महत्वाचा हा निर्णय असून पुढील दीड महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करून या कामाचा शुभारंभ नवीन वर्षात केला जाईल , अशी माहिती आज आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. कामाची सुरुवात झाल्यानंतर पुढील २४ महिन्यांत हा पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

मीरा – भाईंदर शहरात विविध भागात आजही पाण्याची कमतरता आहे. ४० ते ४२तासांनी काही भागात पाणी पोहोचते. शहराची पाण्याची ही समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी म्हणून गेले ३ वर्षे ’एमएमआरडीए’कडून सूर्या पाणी योजनेचे काम सुरु असून त्यातून २१८ एमएलडी पाणी मीरा -भाईंदर शहराला मिळणार आहे. हे पाणी मीरा- भाईंदर शहराच्या वेशीपर्यंत येणार आहे. सूर्या योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून पुढील वर्षी हे पाणी शहराच्या वेशीपर्यंत आणण्याचा प्रयत्न राहील. हे २१८ एमएलडी पाणी शहरात आल्यानंतर त्याचे शहरात वितरण करण्यासाठी शहरात नवीन जलुकुंभ , नवीन पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी ५१६ कोटी इतका प्रकल्प निधीसह मंजूर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत या पाणी पुरवठा प्रकल्पाबाबत तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकल्प मंजुरीचा शासन निर्णय प्रसिद्ध व्हावा म्हणून आमदार सरनाईक प्रयत्नशील होते व २ नोव्हेंबर रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने आता या कामाची निविदा प्रक्रिया करण्यास मीरा -भाईंदर महापालिका मोकळी झाली आहे.

- Advertisement -

 

३० वर्षांची पाण्याची गरज पूर्ण होणार

- Advertisement -

मीरा -भाईंदर शहराने गेले अनेक वर्ष पाण्याचा त्रास सहन केला आहे. त्यामुळे सध्या व भविष्यात वाढणारी शहराची लोकसंख्या लक्षात घेता सूर्या योजनेचे २१८ एमएलडी पाणी योजना आम्ही मार्गी लावली. त्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. आता त्याचवेळी ५१६ कोटी खर्च करून हे २१८ एमएलडी पाणी शहरात वितरित करण्यासाठी संपूर्ण नवीन पाणी वितरण व्यवस्था पुढील दीड ते दोन वर्षात तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सूर्या योजनेचे पाणी शहरात आधी येईल. तोपर्यंत ५१६ कोटी योजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न वायुवेगाने आम्ही करू , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. मीरा भाईंदर शहराची पुढील ३० वर्षांची पाण्याची गरज ओळखून हे ’वन टाइम प्लॅनिंग’ आम्ही केले आहे. त्यामुळे जेव्हा हे पाणी योजनेचे काम पूर्ण होईल त्यावेळी मीरा भाईंदरच्या नागरिकांना पुढील २५ वर्षाची पाण्यासाठीची चिंता नसेल , असेही ते म्हणाले.

- Advertisment -