पालघर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा बुधवार 21 फेब्रुवारी 2024 ते शनिवार 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 52 हजार 321 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे .62 परीक्षा केंद्र व 14 उपकेंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.तर 31 हजार 213 हे सर्वाधिक विद्यार्थी वसई तालुक्यातील परीक्षार्थी म्हणून आहेत.
विद्यार्थिनी कुठल्याही प्रकारची कॉपी करू नये हा उद्देश ठेवून एकूण चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाची दोन, शिक्षणाधिकारी योजना एक, शिक्षणाधिकारी प्राथमिक एक अशा गटात या भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. उपद्रवी केंद्रांना भेट देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ही शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रे ही कॉपीमुक्त असतील. विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. पेपर सोडवताना कोणतेही दडपण न घेता पेपर सोडवावे, अशा शुभेच्छा शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
तालुका. परीक्षा केंद्र प. उपकेंद्रे एकूण परीक्षार्थी.
वाडा 4 1 2426
विक्रमगड 4 – 1785
मोखाडा 3 – 1153
जव्हार 1 1 1215
तलासरी 5 1 2759
डहाणू 7 1 5951
दादर नगर हवेली 1 – 325
पालघर 5 5 5494
वसई. 32 6 31213