Eco friendly bappa Competition
घर पालघर पालघर जिल्ह्यात महावितरणची ५५ कोटी ८४ लाखांची थकबाकी

पालघर जिल्ह्यात महावितरणची ५५ कोटी ८४ लाखांची थकबाकी

Subscribe

महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीज बिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.

वसईः पालघर जिल्ह्यात महावितरणच्या वीज बिलापोटी तब्बल ५५ कोटी ८४ लाखांची थकबाकी आहे. तर कल्याण परिमंडलात १३८ कोटींची थकबाकी झाली आहे. वसई मंडलातील वसई, विरार, नालासोपारा, वाडा, आचोळे विभागातील ५ लाख ९२ हजार ३५५ ग्राहकांनी ११९ कोटी १७ लाख भरले असून २५ कोटी ६१ लाखांची थकबाकी आहे. पालघर मंडलामधील पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या विभागातील १ लाख ६८ हजार ९२२ ग्राहकांनी ३० कोटी ३३ लाख रुपयांच्या विज बिलाचा ऑनलाईन भरणा केला असून ३० कोटी २३ लाखांची थकबाकी वसूल होणे अजूनही बाकी आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीज बिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे.

सुरू आर्थिक वर्षातील वीजबिलाचे १३८ कोटी रुपये अजूनही वसूल होणे बाकी आहेत. ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सुरक्षित असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पुढील तीन दिवसांत अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून चालू वीजबिल व थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळ आणि ग्राहकांसाठीच्या मोबाईल अ‍ॅपवर सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील वीजबिले पाहण्यासह ते भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट पच्या माध्यमातून सुलभ व सुरक्षितपणे ऑनलाईन वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ही सुविधा नि:शुल्क असून ऑनलाईन पेमेंटवर वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -