घर पालघर बँक खात्यामध्ये 6 लाख ९० हजार जमा

बँक खात्यामध्ये 6 लाख ९० हजार जमा

Subscribe

मात्र गोठवलेले बँक खाते सुरू करण्यास आपल्याकडून शक्य नसल्याचे पालघर पोलिसांनी सागर सुतार याला कळवले.

पालघर: सातपाटी येथील सागर सुतार नामक रिक्षा चालकाच्या बँक खात्यामध्ये 6 लाख ९० हजार रुपये बेनामी जमा केल्याच्या कारणावरून चेन्नई येथील माऊंट थॉमस सायबर क्राइम विभागाने या तरुणाला ताब्यात घेतले आहे. कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झाले नसताना आपले बँक खाते गोठवण्यात आले आहे. एकूणच या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा या तरुणाने मांडली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सागर सुतार नामक रिक्षाचालकाने वैद्यकीय उपचारासाठी एटीएम कार्डाचा वापर केला होता. परंतु त्याच्या कार्डातून पैसे निघू शकले नाही. या प्रकरणी त्यांनी सातपाटी येथील बँक ऑफ इंडिया बँकेकडे चौकशी केल्यानंतर त्याचे बँक खाते सायबर क्राइम विभागाने गोठवल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पालघर जिल्हा मुख्यालयातील सायबर क्राइम विभागाशी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी अनेकदा संपर्क साधला. बँक खाते पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार व ईमेलद्वारे चेन्नई येथील सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधला. मात्र गोठवलेले बँक खाते सुरू करण्यास आपल्याकडून शक्य नसल्याचे पालघर पोलिसांनी सागर सुतार याला कळवले.

दरम्यान, या तरुणाला चेन्नई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे त्याच्या मित्र परिवाराकडून सांगण्यात आले. मात्र सागर सुतार यांच्या अटकेबाबत सातपाटी पोलीस तसेच जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयाला कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. याआधी सागर सुतार यांनी काही दिवसांपूर्वी व्हिडीओ ब्लॉग करून आपली कोणतीही चुकी नसताना निव्वळ बँकेच्या चुकीमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा मांडली. आपण आपले बँक खाते पूर्ववत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उलगडा करत आपल्या बँक खात्यात कोणत्याही प्रकारचे पैसे जमा झाले नसताना आपल्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सुतार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -