घरपालघरवनव्यात गारगांव येथील कातकरी वस्तीतील 9 घरे जळून खाक

वनव्यात गारगांव येथील कातकरी वस्तीतील 9 घरे जळून खाक

Subscribe

दोनशेहून अधिक येथील ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

वाडा: वाडा तालुक्यातील मौजे गारगांव येथील एका खासगी मालकीच्या माळरानातील गवताला लागलेला वनवा थेट कातकरी वस्ती पर्यंत येऊन या वस्तीतील 9 घरे जळून खाक झाली आहेत. गावकर्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणल्याने या वस्तीतील काही घरे आगीपासून वाचवता आली. गारगांव या दिड हजारांहून अधिक लोकवस्ती असलेल्या गावाच्या पश्चिमेला कातकरी वस्ती आहे. या वस्तीलगत वसई येथील एका रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात वरकस (माळरान) जमीन खरेदी केलेली आहे. या वरकस जमिनीत मोठ्या प्रमाणावर सुकलेले गवत आहे. या गवताला सोमवारी आज सकाळी अज्ञात कारणाने आग लागली. कडक उन्हामुळे व संपूर्ण गवत सुकलेले असल्याने काही मिनिटांतच ही आग या माळराना लगत असलेल्या कातकरी वस्ती पर्यंत पोहोचली. व अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात या वस्तीतील 9 घरे जळून खाक झाली. दोनशेहून अधिक येथील ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

या आगीत राजेंद्र भोये, मारवत हेलीम, मंगळ मुकणे, नितीन मुकणे, लक्ष्मण दिवा, संदिप भोये, नारायण भोये या सात कुटुंबियांची संपूर्ण घरे, घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, कपडे जळून खाक झाले आहे. तर अन्य दोन घरांचे अंशता: नुकसान झाले आहे. दरम्यान या आगीच्या नुकसानी बाबत महसूल कर्मचार्‍यांकडून पंचनामा करण्यात आला असून या कुटुंबियांना शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -