घर पालघर पालघरच्या सुहास संखेंसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

पालघरच्या सुहास संखेंसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

त्यानंतर डॉ. सुहास संखे यांनी डहाणू येथील अदानी प्रकल्पात कोळसा उचलण्याच्या कामात नफा असल्याचे सांगून आणखी ५० लाख रुपये घेतले. तसेच याकामासाठी वाहने आणि मशिनरी खरेदीसाठी ३० लाख ५० हजार रुपये घेतले होते.

वसईः पालघऱ जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर परिसरात जमीन विकत घेण्यासाठी तसेच डहाणूतील अदानी प्रकल्पात कोळसा उचलण्याच्या कामात गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून दहा कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील आठ जणांविरोधात ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुक, बनावट सरकारी कागदपत्रे बनवणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे संचालक असलेली जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी आहे. पालघरमधील व्यावसायिक डॉ. सुहास संखे यांनी सांबरे यांच्या माध्यमातून जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक प्रज्वल पाटील यांना पालघरमधील नियोजित वाढवण बंदर परिसरात जमीन खरेदी केल्यास भविष्यात चांगला नफा होईल, असे आमिष दाखवले. २०२० साली पाटील यांनी डॉ. सुहास संखे यांच्या सांगण्यावरून जमीन खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर ९ कोटी २२ लाख ६१ हजार रुपये दिले होते. त्यानंतर डॉ. सुहास संखे यांनी डहाणू येथील अदानी प्रकल्पात कोळसा उचलण्याच्या कामात नफा असल्याचे सांगून आणखी ५० लाख रुपये घेतले. तसेच याकामासाठी वाहने आणि मशिनरी खरेदीसाठी ३० लाख ५० हजार रुपये घेतले होते.

सुहास संखे यांनी त्यांच्या साथिदारांनी याजमिनीचे बनावट साठेकरार तयार केल्याची माहिती मिळताच निलेश सांबरे यांनी वाढवण परिसरातील जमिनमालकांशी संपर्क साधला तेव्हा या जमिनींची आधीच विक्री झाल्याची माहिती मिळाली. तेव्हा सांबरे यांनी सुहास संखे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रज्वल पाटील यांनी याप्रकरणी ठाणे न्यायालयात दावा दाखल केला. ठाणे न्यायालयाने याप्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन प्रज्वल पाटील आणि जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या संचालकांची फसवणुक झाल्याचा निष्कर्ष काढून नौपाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर प्रज्वल पाटील यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी सुहास संखे, पूनम चुरी, राहुल पाटील, इस्टेट एजंट प्रज्योत पाटील, अमित चुरी, मोहिन, विजय मढवी आणि मोरेश्वर पाटील यांच्याविरोधात भादवि कलम ४०६, ४२०,४६७,४६८,४६९,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -