Eco friendly bappa Competition
घर पालघर बलात्कारप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

बलात्कारप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये बोईसर दांडीपाडा येथे राहणार्‍या नरेश धोडी याने सागर धोडीने काढलेली क्लिप दाखवून वायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत तीनवेळा बलात्कार केला, असे पिडीत महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बोईसरः एका महिलेवर बलात्कारप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोईसरच्या बेटेगावमधील एका ३४ वर्षीय विवाहितेचे खैरापाडा, बोईसर येथील सागर धोडी याच्याशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. त्याची व्हिडीओ क्लिप सागर धोडीने तयार करून वायरल करण्याची धमकी देत तो वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. मात्र, प्रेमसंबंधाची माहिती घरी कळल्यावर विवाहितेने सागरशी संबंध तोडले होते. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये बोईसर दांडीपाडा येथे राहणार्‍या नरेश धोडी याने सागर धोडीने काढलेली क्लिप दाखवून वायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत तीनवेळा बलात्कार केला, असे पिडीत महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

महिलेच्या सासूला कॅन्सर झाल्याची माहिती मिळाल्यावर सागर धोडीने तिच्या पतीला वाडा तालुक्यातील झडपोली येथील हॉस्पीटलमध्ये मोफत उपचार करून देण्याची बतावणी करून जवळीक साधली. सासूला त्याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, तिथे उपचार व्यवस्थित होत नसल्याने तिला मुंबईच्या प्लॅटीनम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना सासूचा ६ ऑगस्ट २०२३ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे पतीने झडपोडी येथील हॉस्पीटलच्या कारभाराचा व्हिडीओ काढून वायरल केला होता. याचा राग मनात ठेऊन नरेश धोडीने पिडीतेची सागरसोबतची व्हिडीओ क्लिप तिचा नवरा आणि दिराला पाठवली होती. तसेच पालघऱ येथे राहणार्‍या संतोष यादवने सदरची क्लिप वायरल केली होती. त्यामुळे पती आणि दिराला विश्वासात घेऊन तक्रार दाखल केल्याचे पिडीतेने म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी सागर धोडी, नरेश धोडी आणि संतोष यादवविरोधात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

घटनेला राजकीय रंग

दरम्यान, नरेश धोडी हा जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेचा बोईसर शहर अध्यक्ष असल्याने या घटनेला आता राजकीय रंग येऊ लागला आहे. नरेश धोडी जिजाऊच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्यामुळे प्रचंड लोकप्रिय झाल्याने त्यांच्यावर राजकीय षडयंत्र रचून प्रशासनावर दबाव आणून त्यांचे राजकीय करिअर संपवण्यासाठी खोट्या गुन्हयात गोवण्यात आले आहे. तक्रारदाराशी त्यांचे कधीही संभाषणही झालेले नाही. या प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांची समिती गठीत करून किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिजाऊचे पालघर लोकसभा अध्यक्ष महेंद्र ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -