Eco friendly bappa Competition
घर पालघर गाडीमध्ये विनापरवाना हत्यार ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गाडीमध्ये विनापरवाना हत्यार ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

त्या गाडीचा दरवाजा उघडून झडती घेतली असता डिकीमध्ये एक लोखंडी कोयता हत्यार मिळून आला.

भाईंदर :- काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने त्याच्या चारचाकी गाडीमध्ये विनापरवाना कोयता हे हत्यार ठेवले असल्यामुळे त्या व्यक्तीला अटक करून काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये महाजनवाडी, ठाकुरमॉल परिसरामध्ये गस्त करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की ठाकुरमॉल शेजारी असलेल्या डि.बी. ओझोन सोसायटीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या एका कारमध्ये हत्यार लपवलेले आहे. त्यानुसार डि.बी. ओझोन सोसायटीमध्ये उभ्या केलेल्या गाडीची तपासणी करण्यासाठी पोलीस पोहोचले. त्यावेळी तेथे एक कार उभी दिसून आली. ती गेल्या अनेक दिवसांपासून उभी असल्याने तिच्यावर धुळमाती बसलेली होती. त्या गाडीचा दरवाजा उघडून झडती घेतली असता डिकीमध्ये एक लोखंडी कोयता हत्यार मिळून आला.

तो एक लोखंडी कोयत्याला धारदार पाते होते. त्या गाडीबाबत सोसायटीमध्ये राहाणार्‍या रहीवाशांकडे विचारपूस केली. तेव्हा सोसायटीचे रहीवाशी मोहम्मद मुबारक यूसुफ रेतीवाला ऊर्फ दाऊद याची कार असल्याचे त्यांनी सांगितले. मोहम्मद मुबारक युसुफ रेतीवाला ऊर्फ दाऊद ययाला पुढील तपासासाठी कार व हत्यारा सहीत ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात एक लोखंडी कोयता हे हत्यार (शस्त्र) विनापरवाना बाळगले म्हणून काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कोयता कशासाठी ठेवला होता व त्याचा वापर यापूर्वी कोठे केला आहे? का याचा पुढील तपास काशिमिरा पोलीस करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -