घरपालघरबोर्डीत रंगणार भव्य सप्तरंगी चिकू महोत्सव

बोर्डीत रंगणार भव्य सप्तरंगी चिकू महोत्सव

Subscribe

वेगवेगळ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक शेतकरी बागायतदार, कृषी विषयक विविध कलात्मक व्यावसायिकांना याचा फायदा होत आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य आणि ऍग्रो टुरिझमसाठी योग्य समजल्या जाणार्‍या अशा बोर्डी समुद्रकिनार्‍यावर 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी १३ व्या सप्तरंगी चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव आर. इ. डब्ल्यू. एफ. मार्फत हे आयोजन करण्यात येत आहे. डहाणू बोर्डी येथे 2013 मध्ये चिकू महोत्सवाचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते . मागील करोना काळामध्ये एक वर्ष हा महोत्सव झाला नाही. वेगवेगळ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक शेतकरी बागायतदार, कृषी विषयक विविध कलात्मक व्यावसायिकांना याचा फायदा होत आहे.

या महोत्सवात दरवर्षी दीड ते दोन लाख नागरिक भेट देत असतात. कोकण किनारपट्टीच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टी यात विविध कला, कलात्मक वस्तू, येथील प्रसिद्ध खाद्य, येथील वारली चित्रकला विविध चिकू उत्पादनासह प्रसिद्ध खाद्यपदार्थांचे प्रकार या महोत्सवात मांडले जातात. या महोत्सवात पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिक त्याचप्रमाणे उंबरगाव ,वापी गुजरातमधील अनेक नागरिक पर्यटन करत भेट देत असतात. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध वयोगटातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी आपली कला दाखवण्यासाठी 200 स्टॉल लावले जाणार असून शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले आहे. सामाजिक ऐक्य निर्माण होण्याच्या दृष्टीने पर्यटन वाढून येथील नागरिकांच्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होण्यासाठी सप्तरंगी या कल्पनेत हा महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवात विविध प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित केले जाणार आहे . मॉडर्न आर्टमध्ये मंडला आर्ट फुल आर्ट थ्रीडी क्राफ्ट ,पॉटरी, वारली पेंटिंग अशा प्रशिक्षण वर्गांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध कलाकृती यांमध्ये मुलांसाठी मॅजिक शो, पारंपारिक खेळांचे देखील आकर्षण असणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने इंडिया ऍग्रो टुरिझमचा मोठा सहभाग असणार आहे. त्यामध्ये पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी . त्यासाठी बोर्डी समुद्र किनारपट्टीवर या डहाणू भागात विविध ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणे , गड- किल्ले , नदी किनारे, निसर्गरम्य जंगल इत्यादी भौगोलिक दृष्ट्या पर्यटन स्थळे आहेत . त्या सर्व पर्यटन स्थळांची माहिती व ओळख व्हावी जेणे करून बाहेरून येणारे पर्यटक जास्तीत जास्त भेट देऊन येथील पर्यटन स्थळे विकसित होऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी या महोत्सवात विशेष लक्ष घालून पर्यटन विकास करण्याचे दृष्टीने वाव दिला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -