घरपालघरलालमाती खाली चक्क रॅबिटचा भराव?

लालमाती खाली चक्क रॅबिटचा भराव?

Subscribe

त्यामुळे माती भराव दाखवून भ्रष्टाचार करण्याची ही नवी पद्धत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर नव्याने उभारण्यात आलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो कामाच्या दुभाजकांमध्ये लाल माती ऐवजी रॅबिटचा भराव अधिक प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे भविष्यात झाडाची वाढ रखडणार असल्याची चिंता पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एमएमआरडीए अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मीरारोड आणि भाईंदर शहरासाठी असलेल्या मुख्य मार्गावर सध्या मेट्रो मार्गीका क्रं. ९ उभारणीचे काम केले जात आहे. यात बहुतांश ठिकाणी ही मार्गिका अंथरण्यात आली असल्यामुळे त्याखालील परिसर मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे अशा जागेतून जाण्या-येण्याचे रस्ते वेगळे करण्यासाठी मध्यभागी दुभाजकाची उभारणी करून त्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यानुसार शिवार गार्डन समोरील भागात हे दुभाजक नुकतेच उभारण्यात आले आहेत. त्यात माती भराव केला जात आहे. परंतु या माती भरावात केवळ एकच थर मातीचा असून त्याखाली रॅबिटच टाकले जात आहे. यामुळे भविष्यात झाडांना पुरेशी माती न मिळाल्याने ती मरण पावण्याची शक्यता आहे. हे काम मेट्रो मार्गीकेच्या कंत्राटदाराकडून केले जात आहे. परंतु, त्याकडे मेट्रो तथा एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे माती भराव दाखवून भ्रष्टाचार करण्याची ही नवी पद्धत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे.

चौकट –

- Advertisement -

एमएमआरडीए म्हणतेय काम योग्यच

मेट्रो मार्ग ९ मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्राधिकारणामार्फत ज्या ठिकाणी मेट्रो गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. अशा ठिकाणी रस्ता दुभाजक बसवून रस्ता रहदारीस खुला करण्यातत आला आहे. सदर रस्ता दुभाजकांमध्ये नियमानुसार मुरूम, लाल माती, शेणखत भरून विविध फुलझाडे आणि इतर झाडे लावून सौंदर्यीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. सदर काम सल्लागारांच्या देखरेखीखाली सुरू असून, सामान्य सल्लागारांचे पर्यावरण तज्ज्ञ नेहमी या बाबतीत दक्ष आहेत, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीए कडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -