घर पालघर निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

Subscribe

मनोर पोलीस ठाण्यातर्फे मनोर ग्रामपंचायत सभागृहात शांतता समिती मोहल्ला समिती, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि राजकिय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा पाडवी बोलत होत्या.

मनोर, आगामी काळात येणार्‍या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व शांतता कायम टिकवून ठेवत,उत्सव साजरा करून कोणतेही गालबोट न लागता शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी केले.उत्सव साजरा करताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालघर जिल्हा पोलीस दल सक्षम असल्याचे सांगत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे पाडवी यांनी सांगितले. मनोर पोलीस ठाण्यातर्फे मनोर ग्रामपंचायत सभागृहात शांतता समिती मोहल्ला समिती, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि राजकिय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा पाडवी बोलत होत्या.

बैठकीत आगामी आठवड्यात साजरे होणारे सण शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरण व्हावे, याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा, आगामी होऊ घातलेले धार्मिक सण उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत साजरे व्हावेत, यासाठी गावकर्‍यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी उपस्थितांना केले.

- Advertisement -

 

सोशल मीडिया जपूर वापरा

- Advertisement -

तसेच पालघर सायबर सेल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. जेवढे तुम्ही सोशल मिडीया वापरत आहात, त्याच्यावर समाजविघातक स्टेटस ठेवणे किंवा आलेले मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घेणे गरजेचे आहे. व्हॉट्सपवर काही चुकीचे व्यक्तव्य केले जाणार नाही याची काळजी घ्या. अशा स्टेटसवरून आपापसात वाद न करता, पोलिसांना कळवावे, अशा पोस्टच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची ताकीद उपविभागीय अधिकारी पाडवी यांनी दिली आहे.

- Advertisment -