घरपालघरअनधिकृत शेडवर कारवाई करताना पालिका अधिकार्‍याला धक्काबुक्की

अनधिकृत शेडवर कारवाई करताना पालिका अधिकार्‍याला धक्काबुक्की

Subscribe

त्यावेळी मीरारोड शांतीपार्क परिसरात कारवाई करत असताना कारवाईत अडथळा आणला म्हणून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर : मीरारोड परिसरात फेरीवाले व दुकानाबाहेर काढलेल्या शेड व बांधकामावर तोडक कारवाई करत असताना पालिका अधिकार्‍यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या अहमदउल्ला हुसेन, अदनान हुसेन आणि जिशान खलील यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे. मीरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले, दुकानांच्या बाहेर अनधिकृतपणे तयार केलेले पत्रा शेड या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणार्‍या तक्रारी लक्षात ठेवून पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी स्वतः ऑनफिल्ड येत १५ नोव्हेंबर रोजी “वॉक विथ कमिशनर” या संकल्पनेतून भाईंदर स्टेशन पूर्व, बी.पी. रोड, मिरारोड स्टेशन, शांती नगर परिसरात पाहणी दौरा केला. त्यावेळी आयुक्तांच्या उपस्थितीत त्याच परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि दुकानाच्या बाहेरील वाढविलेल्या अनधिकृत पत्रा शेडवर मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली. त्यावेळी मीरारोड शांतीपार्क परिसरात कारवाई करत असताना कारवाईत अडथळा आणला म्हणून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत पत्राशेड व बांधकाम तसेच दुकानांच्या बाहेर अनधिकृतरित्या तयार करण्यात आलेले पत्रा शेड, बांबूने बांधण्यात आलेले शेड यांच्यावर तोडक कारवाई करून दुकानदारांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाईच्या वेळी पालिका आयुक्त दिलीप ढोले व अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवी पवार, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, प्रभाग अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, फेरीवाला पथक प्रमुख, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, मीरा- भाईंदर शहर पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -