घरपालघरपालघर येथे बनावट नोटा वितरित करणाऱ्यास अटक

पालघर येथे बनावट नोटा वितरित करणाऱ्यास अटक

Subscribe

गुजरात रविधानसभेच्या निवडणुकांवेळी काही कोटी रुपयांच्या बनावट नोटा वितरित करण्यासाठी पालघर येथील दोघाजणांनी ठाणे येथे त्यावेळी नेल्या होत्या.

नदीम शेख,पालघर : भारतीय चलनाच्या 19 लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा छापून वितरित करणार्‍या फहिल इरफान शेख (मुंबई मालवणी ) पालघर शहरातील बोईसर मार्गावरील मेहबूब शेख व दोघा जणांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यात पालघर जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणाचे दोन प्रकार घडले आहेत.
मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याचे सपोनि शिवशंकर भोंसले व सपोनि निलेश साळुंके पोलीस पथकासह पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार फहिल शेख नावाच्या इसमास मुंबई मालाड मालवणी येथील एम एच बी कॉलनी गेट नंबर 8 येथे चौकशी करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे मालवणी परिसरात बनावट नोटा वितरित करण्यासाठी आणल्याचे आढळून आले. त्यानंतरल पालघर येथे जाऊन मेहबूब नशीब शेख यास ताब्यात घेऊन त्याच्या घरातून 18 लाख रुपये दराच्या 500 रुपयांच्या 1796 बनावट नोटा व 2000 रुपये दराच्या 500 बनावट नोटा तसेच 200 रुपये दराच्या 5 बनावट नोटा आणि 100 रुपये दराच्या 5 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत ,अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुजरात रविधानसभेच्या निवडणुकांवेळी काही कोटी रुपयांच्या बनावट नोटा वितरित करण्यासाठी पालघर येथील दोघाजणांनी ठाणे येथे त्यावेळी नेल्या होत्या. या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी पालघरमधील दोन जणांना अटक केली होती.शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कॉम्प्युटरद्वारे मशीन ऑपरेट करून या नोटा बनवत असल्याचे सर्व साहित्य जप्त करून नेले होते व संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरार भागातून पालघर व परिसरातील काही व्यापारांच्याकडून बनावट नोटा वितरित करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळेला बँकांमध्ये या नोटा वटवत असताना काहींवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर मात्र बनावट नोटा बनवण्याची ही मोहीम काही प्रमाणात थंड पडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -