Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सतरा वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाला

सतरा वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाला

Subscribe

रविवारी रात्री तो गावी औरंगाबादला जाणारा होता. पण, त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

वसईः भुईगावच्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळत असताना समुद्रात गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेला भाऊ बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सतरा वर्षीय तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. साहिल त्रिभुवन असे त्याचे नाव आहे. मुळचा औरंगाबादचा रहिवाशी असलेला साहिल सुट्टीसाठी नालासोपार्‍यातील वाघोली गावात राहणार्‍या आपल्या मावशीकडे आला होता. रविवारी रात्री तो गावी औरंगाबादला जाणारा होता. पण, त्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

शनिवारी संध्याकाळी साहिला आपल्या दोन मावसभावांसह भुईगावच्या समुद्रकिनारी क्रिकेट खेळायला गेला होता. यावेळी पाण्यात गेलेला चेंडू आणण्यासाठी त्याचा मावसभाऊ गेला असता तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी साहिल समुद्रात गेला तेव्हा मोठ्या लाटेने त्याला समुद्रात खेचून नेले. साहिल समुद्रात बेपत्ता झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी वसई -विरार महापालिकेच्या अग्निशमन दलासह स्थानिकांच्या मदतीने शनिवारी रात्रीपर्यंत शोधमोहिम हाती घेतली होती. पण, रात्री तो सापडून न आल्याने पुन्हा रविवारी शोधमोहिम सुरु ठेवण्यात आली होती. पण, रविवारी संध्याकाळपर्यंत साहिलचा ठावठिकाणा लागला नव्हता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -