घरपालघरदुर्मिळ किलबिलाट जपण्याचा छोटासा प्रयत्न

दुर्मिळ किलबिलाट जपण्याचा छोटासा प्रयत्न

Subscribe

आणि वन विभाग- महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. यामुळे जागतिक पटलावर वैविध्यपूर्ण पक्षी आढळणारे ठिकाण म्हणून माकुणसार गावचे नाव नक्कीच अधोरेखीत होऊ शकणार आहे.

सफाळे:  माकुणसार परिसराला पश्चिम – उत्तरेकडे खाडी, खाजणाचा भाग आणि गोड्या पाण्याचे बांधारे, पाणथळी जागा आणि पूर्वेकडीलकडील जंगलवेष्टीत डोंगराळ भाग असे वैविध्यपूर्ण निसर्गसौंदर्य आणि पक्ष्यांसाठी सर्वोत्तम अधिवास लाभल्याने अनेक देशी-परदेशी पाहुणे पक्षी आणि दुर्मिळात दुर्मिळ पक्षी आढळून येत आहेत. म्हणूनच माकुणसार ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धन व जैववैविध्येतेचा अभ्यास म्हणून पक्षी निरीक्षण व पक्षी गणना उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी “सह्याद्री मित्र संस्था” आणि “नेस्ट” संस्थेच्या टीमने माकुणसार खाडी परिसर, मालजुई बंधारा आणि पाणथळी जागा अशा विविध ठिकाणी देशी – विदेशी विविध प्रजातींच्या पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवली.

वसई विरार शहर महानगरपालिकेने राबविलेल्या पक्षी गणनेप्रमाणेच आपल्या गावातही असा उपक्रम राबविण्यात यावा अशी संकल्पना इथले सामाजिक कार्यकर्ते नागेश वर्तक यांनी मांडली होती. त्या अनुषंगानेच ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला.माकुणसार येथील पक्षीगणनेसाठी एकंदरीत नेस्ट संस्थेचे आशिष बाबरे, प्रितम घरत आणि सह्याद्री मित्र संस्थेचे निकेत पाटील, दीपक पाटील, उमेश पाटील यांच्यासह माकुणसार, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, चिंचणी आणि मुंबई येथून स्वयंसेवक आले होते.माकुणसार परिसर हा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी सर्वोत्तम अधिवास असल्याने येथील पाणथळी जागा संरक्षित करण्यात याव्यात असे मत नेस्टच्या अभ्यासकांनी या वेळी व्यक्त केले. माकुणसार येथील पक्षी गणनेतील नोंदी ’आशियाई पक्षी गणना’, ई – बर्ड, बीएनएचएस, आणि वन विभाग- महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. यामुळे जागतिक पटलावर वैविध्यपूर्ण पक्षी आढळणारे ठिकाण म्हणून माकुणसार गावचे नाव नक्कीच अधोरेखीत होऊ शकणार आहे.

- Advertisement -

९१ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये अमुर फाल्कन ( अमुर ससाणा), सैबेरियन स्टोनचॅट ( गप्पीदास), सॅन्डपाईपर (तुतारी), वुली नेक स्टॉर्क (करढोक अर्थात पांढर्‍या मानेचा करकोचा), पेन्टेड स्टॉर्क (चित्रबालक रंगीत करकोचा), युरेशियन स्पुनबिल (चमच्या), ग्रे हेरॉन, एरगेटस् असे निरनिराळे पाहुणे मुक्कामास येत आहेत. स्थानिक पक्षांपैकी पाणकावळे, घार, टिटवी, होले, खंड्या, वेडाराघू, सुभग, कोतवाल, बुलबुल, चीरक, शिंजीर, तुतारी आणि दुर्मिळ असलेला महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरोळी (यलो फुटेड ग्रीन पिजन) इत्यादींची नोंद करण्यात आली.

“स्थानिक पातळीवर पक्षी गणना करुन घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून माकुणसार ग्रामपंचायतीला बहुमान लाभला असून, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. आम्ही नक्कीच पक्ष्यांचे अधिवास आणि पाणथळ जागा टिकून राहाव्यात यासाठी प्रयत्नशील असू,”
– नागेश वर्तक, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -