घर पालघर चाकूच्या धाकाने शिक्षक दाम्पत्याला लुटले

चाकूच्या धाकाने शिक्षक दाम्पत्याला लुटले

Subscribe

त्यांचे पती उल्हास सोगले घराच्या मागच्या बाजूस काही काम करीत होते.कुंपणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चार इसम घराच्या अंगणात शिरले.

मनोर: वरई- पारगाव रस्त्यावरील नावझे गावच्या हद्दीतील शिक्षक दाम्पत्याच्या घरात घुसून चाकूच्या धाकाने शिक्षिकेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रिक्षाने आलेल्या चोरांनी अश्विनी सोगले यांच्या अंगावरील सुमारे अडीच लाखांचे दागिने लुटून पोबारा केला आहे.दिवसा ढवळ्या घरात शिरून दागिने लुटण्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अश्विनी सोगले त्यांच्या वरई- पारगाव रस्त्यालगतच्या घरात पेपर वाचत बसल्या होत्या.त्यांचे पती उल्हास सोगले घराच्या मागच्या बाजूस काही काम करीत होते.कुंपणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चार इसम घराच्या अंगणात शिरले.

घराचा दरवाजा उघडा असल्याने चारही जण थेट घरात शिरले.अनोळखी इसम घरात शिरल्याने अश्विनी सोगले यांनी आरडाओरडा करण्याच्या प्रयत्न केला, तेव्हा त्यातील एकाने अश्विनी सोगले यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील दागिन्यांची मागणी केली. उल्हास सोगले यांना त्यांच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते मागच्या दरवाजाने घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चोरांनी दरवाजा आतून बंद करून घेतला होता. प्रयत्न करूनही घरात शिरता येत नसल्याने त्यांनी कुंपणावरून उडी मारून वरई -पारगाव रस्त्यावर पोहोचून मदतीसाठी प्रयत्न केला. मदत उपलब्ध होईपर्यंत चोरांनी अश्विनी सोगले यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र घेऊन रिक्षातून वरईच्या दिशेने पोबारा केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -