भाईंदर :- काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काजू पाड्याजवळ एक भीषण अपघात झाला. एक कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडला. त्या कंटेनरखाली एक कार आणि टॅम्पो ही दबला गेला. यात एकूण चार जण दबली गेले होते. मात्र काशीमिरा वाहतूक विभाग आणि काशीमिरा पोलिसांनी चारही जणांना सुखरुप बाहेर काढून, मिरा रोडच्या ऑर्बिट रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. कारमध्ये मिरा रोडमधील एक डॉक्टर होता.
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक कंटेनर ठाण्याहून गुजरातच्या लेनवर जात होता. यात कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने तो काजूपाड्याजवळ रस्त्याच्या कडेला कलांडला. अपघात होताना, कंटेनरच्या डाव्या बाजूला असलेली एक कार आणि टाटा कंपनीचा टॅम्पो ही या कंटेनरच्या कचाट्यात आले आणि ते कंटेनरच्या खाली दबले गेले. कारमध्ये एक डॉक्टर होते तर टॅम्पोमध्ये टॅम्पो चालक होता. तर कंटेनरमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरसुद्धा दबले गेले होते. चौघांनाही काशीमिरा वाहतूक विभाग आणि काशीमिरा पोलिसांनी सुखरुप बाहेर काढून ऑर्बिट रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. टेम्पो चालकाला बाहेर काढण्याससुमारे एक तास वेळ लागला होता.