घरपालघरदुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास ठरला जीवघेणा

दुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास ठरला जीवघेणा

Subscribe

जखमी तरुण हे पालघर तालुक्यातील अकोली गावचे राहणारे असून एकाच गावातील तरुणांचा अपघाती बळी गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

बोईसर : बोईसर- चिल्हार मार्गावर दुचाकीवरील ट्रिपल सीट प्रवास अतिशय जीवघेणा ठरला आहे. नागझरी नाका येथे काल रात्री अंधारात भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.जखमीला सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत आणि जखमी तरुण हे पालघर तालुक्यातील अकोली गावचे राहणारे असून एकाच गावातील तरुणांचा अपघाती बळी गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे

बोईसर चिल्हार रस्त्यावर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागझरी नाक्याजवळ संस्कृती वर्ल्ड स्कूलच्या प्रवेश द्वारासमोर भरधाव वेगातील दुचाकीने मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील मुरुम वाहतूक करणार्‍या ट्रकला मागच्या बाजूला धडक दिली . यात पपलु म्हसकर (वय.१९ वर्षे) रोहन वावरे (वय २२ वर्षे ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.हे दोघेही पालघर तालुक्यातील अकोली गावचे रहिवासी आहेत. अपघातात गंभीर जखमी असलेल्या किशोर कामडी याला उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास मयत तरुण चिल्हार बोईसर रस्त्यावरील मान येथील एटीएम मधून पैसे काढण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट गेले होते. पैसे काढून घरी परतत असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चिल्हार बोईसर रस्त्यावरील संस्कृती वर्ल्ड स्कूल समोरच मोंटे कार्लो कंपनीकडून मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी रात्रीच्या वेळी पोकलेन मशिनद्वारे मुरूम खोदण्याचे काम सुरू होते. मुरूम रिकामा करून परत खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रक परतत असताना रस्ता पार करताना अपघात हा झाला. चिल्हार- बोईसर रस्त्यालगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे चिल्हार बोईसर रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -