घरपालघरधरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

धरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

Subscribe

मनोर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला .तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

मनोर: वांद्री धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.राहुल सुरेश खरात (वय.30) असे मयत तरुणाचे नाव असून तो मुंबईच्या माझगाव कॉटन ग्रीन काळाचौकी भागातील रहिवासी होता.मयत राहुल त्याची पत्नी आणि मित्राच्या पत्नीसह दुचाकीवरून वांद्री धरणावर वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने आला होता.दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गांजे ढेकाळे गावातील ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्र आणि ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्यात उतरून मयत तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

मनोर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला .तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रविवारचा सुट्टीचा दिवस आणि गटारी एकत्र आल्याने वांद्री धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.सांडव्या लगतच्या टेकडीवर मद्यपार्ट्या जोरात सुरू होत्या. मद्यपान झाल्यानंतर नशेच्या धुंदीत काही तरुण 25 ते 30 फूट उंचीवरून सांडव्याच्या भागात उड्या मारत होते. यावेळी बुडणार्‍या दोन ते तीन पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले.स्थानिकांनी धोक्याची सूचना दिल्यानंतरही मद्यधुंद पर्यटक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -