विरार : वसई- विरार शहर महानगरपालिकेने नागरिकांच्या फायद्याकरिता सी कार्यालयात आधारकार्ड केंद्र चालू केले होते. मात्र हेच आधार कार्ड केंद्र मागील एका वर्षापासून बंद स्थितीत आहे. यामुळे नागरिकांना आधारकार्ड बनवण्यासाठी शहरात वणवण करावी लागत आहे.
वसई- विरार शहर महानगरपालिकेने पालिकेच्या सी कार्यालयात आधारकार्ड केंद्र चालू केले होते. मात्र हे आधार कार्ड केंद्र मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत पडले आहे. यामुळे आधार कार्ड बनवण्यासाठी शहरातील नागरिकांना आता वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने चालू केलेल्या आधारकार्डच्या सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र बंद केलेल्या सेवेमुळे नागरिकांची आधारकार्ड बनवण्यासाठी ओढाताण होत आहे, अशी माहिती नागरिकांनी आपलं महानगरला दिली आहे. पालिकेने हे आधारकार्ड केंद्र चालू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विरार शहराची लोकसंख्या ३२ लाख असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे आणि विरार शहरात एकच आधारकार्ड सेंटर असल्यामुळे नागरिकांना तासन्तास तेथे थांबावे लागते. पालिकेने शहरात अनेक ठिकठिकाणी आधार कार्ड बनवण्याचे शिबीर आयोजित करावेत. यामुळे शाळेतील लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्याचे असल्यास सोईचे पडेल अन्यथा पालिकेने सी कार्यालयामध्ये असलेले आधार कार्ड सेंटर नागरिकांसाठी सेवेत लवकर रुजू करावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मला माझ्या लहान मुलांचे आधार कार्ड बनवायचे आहेत. परंतु पालिकेचे आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे अद्याप आधार कार्ड बनवणे शक्य झालेले नाही. हे केंद्र काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.
रंजना लोंडे – स्थानिक नागरिक, विरार