घरपालघरवीजपुरवठा खंडित झालेल्या हजारो ग्राहकांना अभय

वीजपुरवठा खंडित झालेल्या हजारो ग्राहकांना अभय

Subscribe

या योजनेचा लाभ घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना संधी प्राप्त झाली आहे.

जव्हार : तालुक्यातील वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 6 हजार ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत या योजनेचा लाभ हा घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक आणि उद्योजकांना घेता येणार आहे. जव्हार तालुक्यातील ग्रामीण तथा आदिवासी भागामध्ये शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून येथील आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. या योजनेपैकीच एक योजना ही ‘विलासराव देशमुख अभय योजना’ महावितरणने सुरू केली आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जव्हार तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेल्या 6 हजार ग्राहकांना अभय योजनेचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढल्याने दिलासा मिळत आहे. या योजनेचा लाभ घेऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना संधी प्राप्त झाली आहे.

तालुक्यातील वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 6 हजार ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 31 डिसेंबरपर्यंत या योजनेचा लाभ हा घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक आणि उद्योजकांना घेता येणार आहे. या योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे. योजनेनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. या योजनेचा कालावधी 6 महिन्यांसाठी (1 मार्च 2022 ते ऑगस्ट 2022 पर्यंत) होता. मात्र, अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीज बिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

जव्हार तालुक्यातील थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेल्या सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने विलासराव देशमुख अभय योजनेत सहभागी होऊन योजनेच्या माध्यमातून लाभ घ्यावा.
– विवेक तळणीकर,
उपकार्यकारी उपअभियंता, महावितरण, जव्हार

कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी ही योजना आहे. ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येणार आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 95 टक्के किंवा लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 90 टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या 30 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. शिवाय ,हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या 30 टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या 7 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. उर्वरित रक्कम ठरावीक हप्त्यांत महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -