घरपालघरकसा नियतीचा फेरा आला,आयुष्याचा खेळ बंद झाला

कसा नियतीचा फेरा आला,आयुष्याचा खेळ बंद झाला

Subscribe

बोईसर- चिल्हार रस्त्यावरील गुंदले येथील दोन बंगला येथील क्रॉसिंगवर शुक्रवारी संध्याकाळी (ता ०२) भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणार्‍या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते.

बोईसर: संपूर्ण देशात क्रिकेट हा सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा खेळ आहे.राज्यस्तरापासून अगदी स्थानिक पातळीवर देखील क्रिकेट मोठ्या उत्साहाने खेळला आणि पाहिला जातो.त्यात गावागावात टेनिस क्रिकेटचे वेगळेच चाहते आहेत.परंतु, अशाच एका क्रिकेट स्पर्धेसाठी गेलेल्या युवकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सफाळेजवळील भादवे गावातील दोन तरुणांचा गाडीला खड्डे चुकण्याचा अंदाज न आल्याने झालेल्या भीषण अपघातात (ता.०४) रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. चहाडे- गुंदले रस्त्यावर गरवाशेत येथे नियंत्रण सुटल्याने टायर फुटून कार पलटी झाली.यात चंद्रकांत जगदिश पाटील (वय ४०) आणि ऊत्कर्ष किशोर राऊत (वय २७) (राहणार भादवे)या दोघांचा मृत्यू झाला.तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मयूर वैद्य, धीरज यांना बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोईसर- चिल्हार रस्त्यावरील गुंदले येथील दोन बंगला येथील क्रॉसिंगवर शुक्रवारी संध्याकाळी (ता ०२) भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणार्‍या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी बाळू हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून त्यांची पत्नी सुरेखा हेमाडा आणि राजेंद्र आहडी या दोघांवर उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसांत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत चार जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -