घरपालघरअमेरिकन मॉडेल हत्येप्रकरणी आरोपीला परदेशातून अटक

अमेरिकन मॉडेल हत्येप्रकरणी आरोपीला परदेशातून अटक

Subscribe

२००३ मध्ये काशिमिरा येथे अमेरिकन मॉडलच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी विपुल पटेलला अटक केली आहे.

मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील मिरा भाईंदर परिमंडळ पोलीस पथकाने इंग्लड देशातील प्राग या शहरातून २००३ मध्ये काशिमिरा येथे अमेरिकन मॉडलच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी विपुल पटेलला अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अमेरिकन मॉडेल हत्येप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१, १२० (अ), ४०४ प्रमाणे ८ फेब्रुवारी २००३ रोजी आरोपी प्रग्नेश महेंद्रकुमार देसाई व विपुल पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी प्रग्नेश महेंद्रकुमार देसाई हा मेरिकेचे नागरिकत्व घेवून तेथे राहत होता. प्रग्नेश देसाई याचे लिओना स्विडेस्की (मुळ रा. अमेरिका) हिच्याशी प्रेमसंबंध जुळल्याने त्याची पत्नीने २००३ मध्ये घटस्फोट घेवून मुलांसह विभक्त राहत होती. देसाई व त्याची प्रेयसी काही दिवस भारतात आले होते.

त्यावेळी देसाई याला त्याच्या मित्राने फोन करून सांगितले की, तुझ्या घटस्फोटित पत्नीला तुझ्या प्रेयसीने जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. तेव्हा तो पुन्हा अमेरिकेला गेला. काही दिवसांनी लग्न करण्याच्या बहाण्याने पुन्हा भारतात आला. त्यावेळी प्रग्नेश देसाई याने विपुल मनुभाई पटेल याला त्याची प्रेयसी लिओना स्वीडेस्की हिला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. मुंबई विमानतळावरुन लिओना स्विडेस्की या ३३ वर्षीय अमेरिकन मॉडलची ८ फेब्रुवारी २००३ रोजी अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशाने एनसीबी प्राग झेक रिपब्लीक येथून आरोपी विपुल पटेलला ताब्यात घेवून २७ मे २०२२ रोजी काशिमिरा पोलीस ठाणे येथे आणले. त्याला २८ मे २०२२ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकला होता. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनाचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल या दोघांना अटक केली होती. तर आणखीन दोन आरोपी फरार होते. या खटल्याचा निकाल एका वर्षातच लागला होता. यात दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. पोलीस या निकालाच्या विरोधात मुंबई हाय कोर्टात गेले होते. कोर्टात या प्रकरणाची सुनवाणी झाली असताना, दोन्ही आरोपी गैरहजर राहत होते. त्यामुळे खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घेवून, तपास जलदगतीने सुरु केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई याला बडोद्यामधून न्यायालयात हजर करण्यात आले. तर विपुल पटेल हा झेक रिपब्लिकमध्ये असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा –

UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -